थंडी कमी होणार 

उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या परिसरात चक्रीवादळासाठी पोषक असलेल्या वातावरणामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्याला अडथळा निर्माण होत आहे.
cold
cold

पुणे ः उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या परिसरात चक्रीवादळासाठी पोषक असलेल्या वातावरणामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्याला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे नववर्षाच्या स्वागतालाच राज्यातील थंडी काहीशी कमी झाली आहे. पुढील दोन ते चार दिवस थंडी काही प्रमाणात कमी राहणार आहे. गुरुवारी (ता. ३१) सकाळी आठ वाजेपर्यंत निफाड येथे नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

जम्मू आणि काश्मीर व परिसरात आणि पाकिस्तानच्या उत्तर भागात हिमवृष्टी होत आहे. मात्र राजस्थानच्या वायव्य भागात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण असल्याने थंडीत चढउतार सुरू झाले आहे. उद्या (ता. २) उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली राजस्थान, उत्तर प्रदेश या भागांत सोमवारपर्यंत काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. राज्यातील थंडी काहीशी कमी राहणार आहे. यामुळे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली आणि उत्तर राजस्थान या भागांतील थंडीही कमीअधिक स्वरूपात राहणार आहे. यामुळे राजस्थानच्या पश्‍चिम भागातील चुरू येथे उणे १.३ अंश सेल्सिअस इतके सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले.  गुरुवारी (ता. ३१) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई (सांताक्रूझ) १८.५ (१), ठाणे १७, अलिबाग १७.४ (-१), रत्नागिरी २०.५ (१), डहाणू १७.१ (-१), पुणे १३.१ (३), नगर १३.५ (३), जळगाव १३.४ (३), कोल्हापूर १८.६ (२), महाबळेश्‍वर १४.९ (२), मालेगाव १३.६ (३), नाशिक १४.४ (२), निफाड ११.२, सांगली १८.१ (४), सातारा १४.५ (३), सोलापूर १७.२ (१), औरंगाबाद १४.८ (३), बीड १७.२ (४), परभणी १४.५ (१), परभणी कृषी विद्यापीठ १२, नांदेड १७ (४), उस्मानाबाद १४.१ (१), अकोला १५.४ (२), अमरावती १५.५ (१), बुलडाणा १५.४ (१), चंद्रपूर १४.२ (१), गोंदिया १२.२, नागपूर १४.० (१), वर्धा १४.२ (१), यवतमाळ १५ (१).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com