agriculture news in Marathi cold will be increased in few days Maharashtra | Agrowon

दोन-तीन दिवसात किमान तापमानात होणार घट...

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामान झाले आहे. सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका पाऊस पडला. यामुळे राज्यातील थंडी काही प्रमाणात कमी झाली. परंतु, ढगाळ हवामान निवळल्यानंतर दोन ते तीन दिवसांत पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ हवामान झाले आहे. सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका पाऊस पडला. यामुळे राज्यातील थंडी काही प्रमाणात कमी झाली. परंतु, ढगाळ हवामान निवळल्यानंतर दोन ते तीन दिवसांत पुन्हा थंडी वाढण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

अरबी समुद्राच्या दक्षिण भागात आणि विषवृत्ताच्या हिंद महासागराजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. सोमवारी हे क्षेत्र निवळण्याची शक्यता आहे. तरीही त्याचा काही प्रभाव एक दोन दिवस राहणार असून, कोकण व मध्य महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे. यामुळे किमान तापमान वाढणार आहे.

सध्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. सोमवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत गोंदिया येथे सर्वांत कमी १५.४ अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे. 

सध्या मराठवाडा व विदर्भातील काही भागांत हवामान कोरडे आहे. यामुळे या भागात काही प्रमाणात थंडी असल्याने किमान तापमान १५ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही किमान तापमानात १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून, सायंकाळनंतर हवेत गारवा तयार होत आहे. रात्री बारानंतर थंडीत वाढ होत असून, पहाटे किमान तापमानाचा पारा खाली येत आहे.

मध्य महाराष्ट्र व खानदेशातही ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. या भागात किमान तापमान १६ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. कोकणातही तापमान २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून, या भागातून थंडी गायब झाली आहे.  

सोमवारी (ता. २) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः अकोला १७.० (२), अलिबाग २३.२ (३), अमरावती १६.६, औरंगाबाद १६.७ (४), बीड १८.७ (५), बुलडाणा १७.६ (२), चंद्रपूर १९.२ (५), डहाणू २३.४ (४), गोंदिया १५.४ (१), जळगाव १८.० (५), कोल्हापूर २१.१ (५), महाबळेश्वर १६.१ (२), मालेगाव १९.४ (७), मुंबई २३.४ (४), नागपूर १६.१ (३), नाशिक १७.६ (६), परभणी १७.४ (३), लोहगाव १८.५ (५), पुणे १६.८ (४), रत्नागिरी २४.१ (३), सांगली २१.६ (६), सातारा १८.७ (४), सोलापूर २१.९ (५), ठाणे २३.०, वर्धा १७.६ (३), यवतमाळ १६.०.


इतर बातम्या
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...
कृषी पर्यटनामध्ये रानभाज्यांना महत्त्वसिंधुदुर्ग: राना-वनात, जंगलामध्ये असलेल्या...
इथेनॉलकडे साखर वळविणारकोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून पुणे ः उत्तर भारतात लवकरच दाखल झालेल्या मॉन्सूनचा...
मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाचा अंदाज पुणे ः परतीच्या पावसासाठी काही कालावधी बाकी आहे....
अभूतपूर्व साखर साठ्याचे संकट पुणे: राज्यात ७२ लाख टन साखर शिल्लक असताना येत्या...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...