थंडी दोन दिवस कमीच राहणार 

राज्यातील काही भागांत थंडी कमी-अधिक स्वरूपाची आहे. आज (ता. २७) आणि उद्या (ता. २८) थंडी काहीशी कमी राहणार आहे. वर्षाच्या अखेरीस मंगळवार (ता. २९) नंतर राज्यात पुन्हा थंडी वाढणार आहे.
थंडी दोन दिवस कमीच राहणार 
थंडी दोन दिवस कमीच राहणार 

पुणे : राज्यातील काही भागांत थंडी कमी-अधिक स्वरूपाची आहे. आज (ता. २७) आणि उद्या (ता. २८) थंडी काहीशी कमी राहणार आहे. वर्षाच्या अखेरीस मंगळवार (ता. २९) नंतर राज्यात पुन्हा थंडी वाढणार आहे. शनिवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आवारामध्ये नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर विदर्भातील गोंदिया येथे ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे  हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चकरीवादळासाठी पोषक वातावरण आहे. तर मलाय पेनिसुलाय व परिसर, हिंदी महासागर आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. यामुळे थंडीत चढ-उतार असल्याचे चित्र आहे. 

राज्यातील काही भागांत थंडी असल्याने किमान तापमानात घट झाली आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी, डहाणू या भागांत बोचरी थंडी होती. त्यामुळे या भागात १६ ते २१ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातही कमी-अधिक प्रमाणात थंडी होती. पुणे, नगर, नाशिक, जळगाव भागांत बऱ्यापैकी थंडी होती. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागात थंडी कमी होती. मराठवाड्यातही थंडी कमी असल्याने किमान तापमान ८ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातील काही भागांत किंचित थंडी असल्याने किमान तापमानात घट असल्याचे आढळून येते. यामुळे या भागात ८ ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान नोंदविले गेले. 

शनिवारी (ता. २६) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रूझ) १९.४ (१), ठाणे १९, अलिबाग १६.८ (-२), रत्नागिरी २१.६ (२), डहाणू २०.१ (२), पुणे १२.७ (२), जळगाव १२.७ (१), कोल्हापूर १७.६ (३), महाबळेश्‍वर १४ (१), मालेगाव १३.४ (३), नाशिक १४.६ (४), निफाड १०.२, सांगली १५.९ (२), सातारा १४.४ (२), सोलापूर १५.२, औरंगाबाद १२.१ (१), बीड १६.९ (४), परभणी ११.४ (-२), परभणी कृषी विद्यापीठ ८.२, नांदेड १२.५, उस्मानाबाद १३.२, अकोला १२.५ (-१), अमरावती १२.४ (-२), बुलडाणा १२.८ (-१), चंद्रपूर १०.६ (-३), गोंदिया ८.४ (-२), नागपूर १०.४ (-२), वर्धा ११ (-२), यवतमाळ १० (-५).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com