कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असेल, तसेच समतोल आहार, शुद्ध हवेची कमतरता,
अॅग्रो विशेष
डिसेंबर ते फेब्रुवारीत अशी असेल थंडी; अंदाज जाहीर...
नवी दिल्ली ः डिसेंबर ते फेब्रुवारी या हंगामात उत्तर भारत वगळता बहुतेक भागांत तापमान अधिक राहील. मध्य आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा किमान तापमान एक अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण, पूर्व आणि मध्य भारतात तापमान ०.५ अंश सेल्सिअसने अधिक राहील. त्यामुळे यंदा गारठा कमीच राहणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिली.

भारतीय हवामान विभागाने डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांतील हंगामाचा तापमानाचा अंदाज जाहीर केला आहे. ‘‘देशातील अति उत्तरेतील भाग वगळता बहुतेक भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील. हंगामात मध्य भारत आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये किमान तापमान हे सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअसने अधिक राहणार आहे.
तर, दक्षिणेतील काही उपविभागांत आणि पूर्व तसेच मध्य भारतातील काही उपविभागांत तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सिअसने अधिक राहील. हंगामातील कमाल तापमान हे मध्य भारतातील काही भागांमध्ये थंड आणि दक्षिणेतील काही उपविभागांत काहीसे उष्ण राहण्याची शक्यता आहे,’’ असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.
शीतलहरीची शक्यता
डिसेंबर ते फेब्रुवारी या हंगामात शीतलहर येण्याची दाट शक्यता आहे. शीतलहर पट्ट्यात पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. तर जम्मू, काश्मीर, लडाख, मराठवाडा, विदर्भ, सौराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या विभागांतही शीतलहर येण्याची शक्यता आहे.
- 1 of 435
- ››