थंडीचा कडाका कायम राहणार

नववर्षापर्यत थंडीचा काही प्रमाणात प्रभाव राहणार आहे. गुरुवारी (ता. २४) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आवारात नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
cold, temperature, thandi, थंडी, गारवा, गारठले, गारठा
cold, temperature, thandi, थंडी, गारवा, गारठले, गारठा

पुणे :  हिमालयाच्या व परिसरात असलेल्या हिमवृष्टीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह कमी झाला असला, तरी राज्यातील अनेक भागांत थंडी अजूनही कायम आहे. नववर्षापर्यत थंडीचा काही प्रमाणात प्रभाव राहणार आहे. गुरुवारी (ता. २४) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आवारात नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीने चांगलाच जम बसविला होता. मागील तीन दिवसांत थंडीने चांगलीच हुडहुडी भरवली होती. त्यामुळे किमान तापमानाचा पारा ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली होता. मात्र बुधवारपासून पुन्हा थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा वाढून ८ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावला आहे. दिवसभर थंड वातावरण नसले, तरी सायंकाळनंतर थंडी वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी थंडीच्या कडाक्याने दिवस थंड अनुभवायला येत होता. मात्र आता थंडी काहीशी कमी झाली असली, तरी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसने घट झाली आहे. यामुळे विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा वगळता गोंदिया, नागपूर भागांत किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली होता. मराठवाड्यात थंडीत चढउतार झाले असल्याने किमान तापमान ८ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही थंडी कमीअधिक स्वरूपात आहे. पुणे, नगर, नाशिक, जळगाव भागांत थंडी अधिक आहे. तर इतर भागात थंडी कमी झाली आहे. कोकणात बऱ्यापैकी थंडी असल्याने किमान तापमान अजूनही १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.  गुरुवारी (ता.२४) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई (सांताक्रूझ) १६.२ (-२), ठाणे २०, अलिबाग १६.८ (-२), रत्नागिरी १७.८ (-२), डहाणू १७ (-१), पुणे ९.९ (-१), जळगाव १०.३ (-१), कोल्हापूर १६.५ (१), महाबळेश्‍वर १३.४, मालेगाव ११.४ (१), नाशिक ९.२ (-१), निफाड ८.६, सांगली १४.३ (-२), सातारा १२.५, सोलापूर १३.६ (-२), औरंगाबाद १०.४ (-१), बीड १५.७ (-२), परभणी १२.२ (-१), परभणी कृषी विद्यापीठ ८.२, नांदेड १०.५ (-२), उस्मानाबाद ११.५ (-२), अकोला १०.४ (-३), अमरावती ११.९ (-३), बुलडाणा १२.४ (-२), चंद्रपूर ११.२ (-३), गोंदिया ८.८ (-३), नागपूर ९.८ (-३), वर्धा १०.२ (-३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com