agriculture news in Marathi cold will increased in state Maharashtra | Agrowon

थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहण्यास सुरुवात; थंडी वाढण्याचे संकेत 

बुधवार, 13 जानेवारी 2021

उत्तर भारतातील अनेक भागांत थंडीची लाट आली आहे. या भागाकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह काही प्रमाणात वाहण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे ः उत्तर भारतातील अनेक भागांत थंडीची लाट आली आहे. या भागाकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह काही प्रमाणात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातही हवामान कोरडे असल्याने थंडीने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांत थंडी वाढेल. मंगळवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात नीचांकी १२.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र होते. आता हे कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकत आहे. त्यातच दक्षिण भारतातील पूर्व भागातील बंगालचा उपसागराच्या नैर्ऋत्य भाग व श्रीलंकेची किनारपट्टी या दरम्यान चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह राज्याच्या दिशेने पुन्हा काही प्रमाणात सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा दोन ते तीन दिवसांत झपाट्याने खाली आला आहे. 

सध्या राज्यातील अनेक भागांत थंडी कमी अधिक स्वरूपात असली तरी काही भागांत थंडीने जम बसविण्यास सुरुवात केली आहे. कोकणात अजूनही थंडी कमी असल्याने किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रात थंडी हळूहळू वाढू लागली आहे. यामुळे किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मराठवाड्यातही बऱ्यापैकी थंडी असल्याने किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. या भागात १२ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. विदर्भात थंडी कमी-जास्त स्वरूपात आहे. त्यामुळे किमान तापमान १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. 

मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः 

 • मुंबई (सांताक्रूझ) २२.५ (५) 
 • अलिबाग २१.९ (४) 
 • रत्नागिरी २३.३ (४) 
 • डहाणू २२.५ (५) 
 • पुणे १६.२ (५) 
 • जळगाव १७ (५) 
 • कोल्हापूर २०.५ (५) 
 • महाबळेश्‍वर १६.९ (३) 
 • नाशिक १७.२ (७) 
 • सांगली १७.६ (५) 
 • सातारा १७.६ (५) 
 • सोलापूर १८.६ (२) 
 • औरंगाबाद १६.५ (४) 
 • परभणी १७.४ (३) 
 • नांदेड १८ (४) 
 • अकोला १७.६ (३) 
 • अमरावती १९.७ (५) 
 • बुलडाणा १८ (३) 
 • चंद्रपूर १७.६ (३) 
 • गोंदिया १६.५ (३) 
 • नागपूर १८ (५) 
 • वर्धा १८.४ (५) 
 • यवतमाळ १६ (१) 
टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर...
लाल वादळ मुंबईत धडकले नाशिक : दिल्ली येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी...
शेतीपंप वीजबिले तपासली जाणार; चुकीची...कोल्हापूर : ‘‘राज्य सरकारने कृषिपंप वीजजोडणी धोरण...
राज्यात एफआरपीचे ७७ टक्के वितरणपुणे : साखर कारखान्यांकडे लक्षावधी टन साखर पडून...
पूर्व विदर्भात गुरुवारी पावसाची शक्यतापुणे : मराठवाडा ते बिहार या दरम्यान कमी दाबाचा...
देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख...कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने...
पशुसंवर्धन विभागात ३० टक्‍के पदे रिक्‍तनागपूर : पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुर्दशेसोबतच...
दिल्लीतील ट्रॅक्‍टर परेडला हिरवा कंदील...नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले...
बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची...
औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्रऔरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना...
गोंदियात किमान तापमान १० अंशांवरपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर...
शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी...
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकारनवी दिल्ली ः शेतकरी नेते ‘कृषी कायदे रद्द करणे...
शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या...
बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू...
कृषिपंपाच्या थकबाकीची आता ऊसबिलातून...सोलापूर :  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि...