नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
अॅग्रो विशेष
थंडी कायम राहण्याची शक्यता
कोरड्या झालेल्या वातावरणामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. येत्या चार ते पाच दिवस ही थंडी कायम राहणार आहे.
पुणे ः कोरड्या झालेल्या वातावरणामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. येत्या चार ते पाच दिवस ही थंडी कायम राहणार आहे. शुक्रवारी (ता. २२) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगीत, बाल्तीस्तान व मुजफ्फराबाद भागात आजही काही प्रमाणात पाऊस पडेल. तर पंजाब, हरियाना, चंडीगड आणि दिल्ली भागांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील. यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांतील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. यातच काही भागांत थंडीची लाट असल्याने उत्तरेकडून राज्याच्या दिशेने थंड वाऱ्याचे प्रवाह वाहू लागले आहेत. यामुळे राज्यातील जवळपास सर्वच भागांत थंडी वाढली आहे.
मध्य महाराष्ट्रातही थंडी असल्याने किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मराठवाडा व विदर्भात थंडी अधिक प्रमाणात असल्याने किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली उतरला आहे.
विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा भागांत कडाक्याची थंडी आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने खाली आला आहे. तर गोंदियामध्ये ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. मराठवाड्यातही परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात ९.५, मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १०.५ अंश किमान तापमान नोंदविले गेले. कोकणातही बऱ्यापैकी थंडी वाढली असल्याने किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले आहे. डहाणू, अलिबाग या भागांत किमान तापमान १५ ते १६, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी भागांत १७ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले गेले.
शुक्रवारी (ता.२२) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) १७
- ठाणे १९
- अलिबाग १५.३ (-२)
- रत्नागिरी १८.२,
- डहाणू १६.५ (-१)
- पुणे १३.७ (३)
- जळगाव १२.७ (-१)
- कोल्हापूर १८.१ (३)
- महाबळेश्वर १५.४ (२)
- मालेगाव १४.६ (४)
- नाशिक १२ (२)
- निफाड १०.५
- सांगली १७.६ (३)
- सातारा १५ (२)
- सोलापूर १८.२ (२)
- औरंगाबाद १४.६ (२)
- बीड १७.३ (३)
- परभणी १५.६ (१)
- नांदेड १७.५ (४)
- उस्मानाबाद १७.३ (२)
- अकोला १५.१ (१)
- बुलडाणा १५.६ (१)
- चंद्रपूर १४.६ (-१)
- गोंदिया ९.६ (-४)
- नागपूर ११ (-३)
- वर्धा १२.६ (-१)