हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
अॅग्रो विशेष
'अवकाळी'ने राज्यात काही प्रमाणात थंडीत वाढ
अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात थंडी वाढली आहे. पुढील काही दिवस थंडी राहणार आहे.
पुणे ः अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात थंडी वाढली आहे. पुढील काही दिवस थंडी राहणार आहे. शनिवारी (ता. २०) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
राज्यात आकाश निरभ्र झाल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह पुन्हा काही प्रमाणात सुरू होईल. त्यामुळे किमान तापमानात चढ-उतार होईल. गेल्या आठवडाभर ढगाळ वातावरणाणुळे थंडी काहीशी कमी होऊन किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या वर गेला होता. मात्र आता राज्यातील काही भागांत पुन्हा थंडी वाढू लागली आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी थंडीत किंचित वाढल्याने किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. उस्मानाबाद शहरापाठोपाठ निफाड येथे १०.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले.
कोकणातील काही भागांत अंशत ढगाळ वातावरण असल्याने थंडी चांगलीच कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात थंडी असल्याने किमान तापमान १० ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही गारवा असल्याने किमान तापमान ८ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातील सर्वच भागांत थंडी वाढली आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. या भागात किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.
शनिवारी (ता. २०) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
- मुंबई (सांताक्रूझ) १८.६
- ठाणे २०.२
- अलिबाग १९.५ (१)
- रत्नागिरी २२ (३)
- डहाणू १९.२ (१)
- पुणे ११.५ (-१)
- नगर १५.६ (२)
- जळगाव १४.७ (-१)
- कोल्हापूर १६.६
- महाबळेश्वर ११.३ (-३)
- मालेगाव १६.६ (२)
- नाशिक १४.२ (२)
- निफाड १०.५
- सांगली १६.४ (१)
- सातारा १३.७ (-१)
- सोलापूर १४.९ (-३)
- औरंगाबाद १३.४ (-१)
- बीड १३.३ (-२)
- परभणी १३.४ (-३)
- परभणी कृषी विद्यापीठ १६.०
- नांदेड १४.५
- उस्मानाबाद ८.८ (-७)
- अकोला १५.२ (-१)
- अमरावती १५.६ (-२)
- बुलडाणा १४.८ (-२)
- चंद्रपूर १५.६ (-२)
- गोंदिया १४.८ (-१)
- नागपूर १५.२ (-१)
- वर्धा १४.६ (-२)
- यवतमाळ १४ (-४)