इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य करा : झिरवाळ

नाशिक :सरकारने इथेनॉल निर्मितीस चालना दिली आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य करावे,’’ असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
Collaborate with ‘kadawa’ for ethanol perfection: Jirwal
Collaborate with ‘kadawa’ for ethanol perfection: Jirwal

नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम नियोजनामुळे कादवा कारखाना उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देत आहे. सध्या केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे शक्य नाही. त्यामुळेच सरकारने इथेनॉल निर्मितीस चालना दिली आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य करावे,’’ असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

‘कादवा’च्या ४४ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी ‘कादवा’चे अध्यक्ष श्रीराम शेटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दिलीपराव बनकर, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय पाटील, राज्य सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

झिरवाळ म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतआहे. शेतकरी ‘कादवा’ला प्राधान्य देत आहेत. तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. कारखान्याचे डीस्टीलरी इथेनॉल प्रकल्पास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’’   बनकर म्हमाले, ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्रीराम शेटे यांच्या नेतृत्वात कारखाना सुरू आहे.’’ 

साखरेला उठाव नाही. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आहे.  त्यामुळे इथेनॉल निर्मिती काळाची गरज आहे. उभारणीसाठी शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ठेवी ठेवाव्या, असे आवाहन शेटे यांनी केले. 

एक कोटींची ठेव जमा

सभासद, शेतकरी, कामगार, अधिकारी, माजी अधिकारी कामगारांनी उस्फुर्त प्रतिसाद देत ठेवी ठेवण्याचे जाहीर केले. यात कामगार युनियनसह कामगारांनीही ठेवी देण्याचे जाहीर केले. पहिल्याच दिवशी सुमारे १ कोटी ठेवी जमा झाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com