अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात दोन हजार लिटरची वाढ 

दुधाची उचल होत नसल्याने दूध व्यवसायिकांनी शासकीय दुग्ध योजनेला दूधाचा पुरवठा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शासकीय दुग्ध योजनेच्या संकलनात दोन हजार लिटरची वाढ नोंदविण्यात आली आहे.
शासकीय दूध योजनेच्या संकलनात  दोन हजार लिटरची वाढ In the collection of government milk scheme An increase of two thousand liters
शासकीय दूध योजनेच्या संकलनात  दोन हजार लिटरची वाढ In the collection of government milk scheme An increase of two thousand liters

अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे व्यवसाय बंद आहेत. परिणामी दुधाची उचल होत नसल्याने दूध व्यवसायिकांनी शासकीय दुग्ध योजनेला दूधाचा पुरवठा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शासकीय दुग्ध योजनेच्या संकलनात दोन हजार लिटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. 

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत जिल्ह्यात सुरुवातीला आठवडाभराचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारने सरसकट पंधरा दिवसांची टाळेबंदी जाहीर केली. हॉटेल चालकांना पार्सल सुविधा देण्याची मुभा असली तरी मिठाई सारख्या पदार्थांना ग्राहकांची मागणी नाही. प्रतिबंधात्मक आदेशामुळे बाहेर फिरण्यावर देखील निर्बंध असल्याने चहा व्यवसायिकांनी देखील आपला व्यवसाय बंद ठेवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे दुधाची मागणी घटली आहे. या साऱ्याच्या परिणामी दररोज संकलित होणाऱ्या दूधाचे करावे तरी काय असा प्रश्न दुग्ध व्यवसायीकांसमोर निर्माण झाला होता. त्यांच्याकडून आता शिल्लक दुधाचा पुरवठा शासकीय दुग्ध योजनेला केला जात आहे.

शासकीय दुग्ध योजनेला जानेवारी महिन्यात २४८७ लिटर दररोजची आवक होती. फेब्रुवारी महिन्यात शासकीय दूध योजनेला होणारा पुरवठा कमी झाला. फेब्रुवारी महिन्यात २१०० लिटर दुधाची आवक होत होती. आता एप्रिल महिन्यात मात्र शासकीय दुग्ध योजनेला होणारी आवक तब्बल दोन हजार लिटरने वाढली आहे. ती सरासरी चार हजार लिटरवर पोहोचल्याची माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गिरीश सोनोने यांनी दिली.

आठ तालुका दुग्ध संकलन संघ, बावीस जिल्हा दुग्ध संकलन संघाकडून सध्या दुधाची खरेदी करण्यात येत आहे. त्यानंतर ते दूध जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाला पाठविण्यात येते. येथे दुधावर प्रक्रिया होऊन पाकीट बंद दूध तयार करून त्याची एजन्सीमार्फत विक्री केली जाते. दूध पावडर निर्मिती करता १००० लिटर दूध भंडारा जिल्हा शासकीय दुग्ध उत्पादन संघाकडे पाठविण्यात येत असल्याची माहिती देखील देण्यात आली. 

खासगी खरेदी मंदावली  ३.५ व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाची खरेदी शासकीय दूध योजना अंतर्गत २५ रुपये लिटर नुसार करण्यात येत आहे. खासगी व्यावसायिकांकडून या तुलनेत ज्यादा दर मिळतात. मात्र कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय प्रभावित झाल्याने खासगी खरेदी मंदावली आहे. दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी दुग्ध योजनेला दुधाचा पुरवठा करीत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com