हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
सामूहिक गट शेतीतील ऊस तोडणीस सुरुवात
सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस साखर कारखान्याच्या सहयोगाने पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) परिसरात ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांनी सामूहिक गट शेतीचा प्रयोग सुरू केला आहे.
नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीस साखर कारखान्याच्या सहयोगाने पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) परिसरात ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांनी सामूहिक गट शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. ऊस विकास कार्यक्रमांतर्गत हा प्रयोग राबविण्यात आला आहे.
ऊस तोडणीस प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. येथे शंभर शेतकऱ्यांच्या दीडशे एकरात सामूहिक गट शेतीत लागवड केलेल्या उसाच्या तोडणीस द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांच्या उपस्थितीत तर मुकादम परशुराम राठोड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला.
द्वारकाधीशच्या सामूहिक ऊस शेतीचा यशस्वी प्रयोग
कारखाना ऊस विकास कार्यक्रमासाठी बागलाण, साक्री, नवापूर व कळवण तालुक्यांमध्ये गेली २१ वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शास्त्रोक्त पद्धतीने ऊस विकासाच्या योजना राबवीत आहे. प्रमाणित ऊस बियाण्यापासून पीक संगोपनासाठी संपूर्ण मालरूप खर्च विनाव्याजी राबवीत आहे. त्यासाठी व्ही. एस. आय, पुणे या नामांकित संशोधन संस्थेचा सल्ला, तज्ज्ञ अधिकारी यांचे मार्गदर्शनाने ऊस उत्पादन एकरी ३० ते ३५ टनांवरून ५० ते ६० टनापर्यंत तर साखर उतारा १०.३३ टक्क्यांवरून ११.५७ टक्क्यांपर्यंत मिळत आहे. या हंगामातील साखर उतारा टक्के (ता.३ अखेर) ११.१४ टक्के आहे.
गळीत हंगाम अद्याप चालू आहे. कारखान्याचे विविध ऊस विकास योजनेअंतर्गत सामूहिक ऊस शेती पथदर्शक प्रकल्प पिंपळनेर येथे पंच कमिटीचे अध्यक्ष सुदाम पगारे व लाभार्थ्यांचे सहकार्याने यशस्वी प्रयोग झाल्याचे कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव यांनी योजनेतील ऊसतोड कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केली.
एकरी ऊस उत्पादनात वाढ व मार्गदर्शन सुलभ होण्याच्या दृष्टीने कारखान्याच्या सहकार्याने फड बागायतीत शंभर लाभार्थ्यांनी त्यांचे दीडशे एकर क्षेत्रावर कारखान्याचे ऊस विकास योजनेअंतर्गत सामूहिक शेतीची यशस्वी प्रयोग केला आहे. हा आपला प्रयोग आदर्श मानून कार्यक्षेत्रात शक्य होईल, तेथे प्रकल्प राबविले जातील त्यासाठी उत्पादकांचे सहकार्य आवश्यक राहील, असे सावंत यावेळी म्हणाले.
- 1 of 1099
- ››