शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना कांद्याच्या गोण्या भेट देण्याचा प्रयत्न

शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना कांद्याच्या गोण्या भेट देण्याचा प्रयत्न
शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना कांद्याच्या गोण्या भेट देण्याचा प्रयत्न

नाशिक : राज्य सरकारच्या कांदा उत्पादकांना दोनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्याचाच भाग म्हणून कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांना कांद्याच्या गोण्या भेट देण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायकासह सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून कांद्याच्या गोण्या ताब्यात घेतल्या.

  जिल्ह्यात कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीच्या विरोधात गावोगावी शेतकऱ्यांची आंदोलने होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांदा विक्रीचे पैसे मनिआॅर्डरने पाठवून शेतकरी आपला संताप व्यक्त करीत आहेत. परिणामी कांदा उत्पादकांना शासनाने प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र, ते तुटपुंजे असल्याने सर्वत्र नाराजी आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला.

सुरक्षारक्षकांनी अडवून कांद्याच्या गोण्या ताब्यात घेतल्या. त्यानंतर शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पाठविले. या वेळी त्यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार दोनशे रुपये अनुदानाची रक्कम तुटपुंजी अाहे. सरकारने किमान सातशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान सरसकट द्यावे. नवीन कांदाही अल्पदरात विक्री होत असल्याने त्यासाठी दोन हजार रुपये हमीभाव देण्यात यावा. अशोक बोडके, सुरेश गिते, खंडेराव दिघोळे, सोमनाथ गिते, नाना काकड, जयराम गामणे, पुंडलिक बर्के, सत्यभान सानप, सुरेश गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com