agriculture news in Marathi, collector Shrikant says, not option for farmers producers companies, Maharashtra | Agrowon

शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही: जिल्हाधिकारी श्रीकांत
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 मे 2019

लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने शोषण करणाऱ्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. त्याला तोंड देऊन सन्मानाने उभे राहायचे असल्यास शेतकरी उत्पादक कंपन्यांशिवाय पर्याय नाही. समविचारी लोकांनी एकत्र येऊन शेतीचे उत्पादन वाढविणे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. 

लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने शोषण करणाऱ्या व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. त्याला तोंड देऊन सन्मानाने उभे राहायचे असल्यास शेतकरी उत्पादक कंपन्यांशिवाय पर्याय नाही. समविचारी लोकांनी एकत्र येऊन शेतीचे उत्पादन वाढविणे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. 

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत एमएसडीपीच्या मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. ३) डीपीडीसी सभागृहात झाले. याप्रसंगी ते बोलत होते. `सकाळ’च्या सिमॅसिस लर्निंग एलएलपी व पॅलेडियम इंडियाच्यावतीने राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी कौशल्य विकास कार्यक्रमात प्रशिक्षित झालेल्या आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी एपी ग्लोबालेचे कार्यकारी उपाध्यक्ष बॉबी निंबाळकर, पॅलेडियम इंडियाच्या अध्यक्षा श्रीमती बार्बरा स्टॅन्कोनिकोव्हा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहसंचालक राजू वाकुडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपसरव्यवस्थापक आकाश मोरे, आत्माचे प्रकल्प संचालक डी. एल. जाधव, `अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, सकाळचे कार्यकारी संपादक संजय वरकड  यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या वेळी श्री. श्रीकांत म्हणाले, शेतकऱ्यांनी गट, तट व राजकारणापासून अलिप्त राहून आर्थिक उन्नतीसाठी एकत्र यायला हवे. एकत्र येऊन कंपनी स्थापन केल्यास शासन, विविध संस्था व बॅंकांच्या योजनांचा लाभ घेता येईल. यासंदर्भात शेतकरी गट व कंपन्यांच्या सदस्यांना जिल्हा प्रशासन आवश्यक मदत करेल. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून काम करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.

कार्यशाळेची प्रस्तावना ‘अॅग्रोवोन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केली, तर प्रकल्पाचे सचित्र सादरीकरण अमित जोशी यांनी केले.  या अभियानात प्रशिक्षणानंतर नोंदणी झालेल्या दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अध्यक्षांना प्रमाणपत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. यात मुरुडेश्वर व वडवळ नागनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचा समावेश आहे. यानंतर कार्यशाळेत इरादापत्र दिलेल्या शेतकऱ्यांसोबत विपणनाची जोडसाखळी, अर्थव्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांनी चर्चात्मक संवाद साधला. यानंतर सादर झालेल्या यशोगाथांमुळे उपस्थित शेतकऱ्यांना कंपनी नोंदणीसाठी प्रेरणा मिळाली.
 

इतर इव्हेंट्स
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काळी आई, जीवतंजू, शेतकरीच माझे गुरू :...पुणे : काळी आई, माझ्या शेतीत वावरणारे...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...
प्रशासनातील शेतकरीपुत्रच घोटताहेत...पुणे : शासकीय नोकऱ्यांतील शेतकऱ्यांची पोरंच...
पाणी व्यवस्थापनासाठी गावाला मिळणार एक...पुणे : महाराष्ट्रातील जे गाव पाणी...
नृत्याविष्कार अन् ठसकेबाज लावण्यांनी...पुणे : मराठी, हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवरील...
बाजार आधारित शेती उत्पादनाची गरज ः दिवसेपुणे  : कृषी खात्याच्या माध्यमातून...
विकासाच्या बेटांचा होतोय गौरव ः शेखर...पुणे : ‘राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही विकासाची...
राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न...पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘...
कोण होणार महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON AWARDS : धैर्य, हिंमत व...अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार  वैशाली येडे...
शेतशिवार फुलविणाऱ्या कर्तृत्ववान...पुणे  : लाख संकटे असतानाही अतुलनीय कष्ट,...
AGROWON_AWARDS : जलव्यवस्थापन, पीक...ॲग्रोवन स्मार्ट जलव्यवस्थापक शेतकरी पुरस्कार डॉ...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना पर्याय नाही:...लातूर : शेतकरी एकत्रित येऊन वाटचाल करीत नसल्याने...