To the College of Biotechnology, Latur Approval of Rs. 3 crore for the course
To the College of Biotechnology, Latur Approval of Rs. 3 crore for the course

लातूरमधील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास अभ्यासक्रमासाठी ३ कोटींच्या निधीस मान्यता

परभणी : लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमास येत्या पाच वर्षांत सुमारे ३ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता प्राप्त झाली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत ही मान्यता मिळाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

केंद्रिय जैवतंत्रज्ञान विभागाद्वारे देशातील विविध संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. या उपक्रमाचे समन्वयक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत पाटील यांनी लॉकडाउनच्या कालावधीत या प्रस्तावाचे ऑनलाइन सादरीकरण केले होते.

महाराष्ट्रातून या उपक्रमास मान्यता मिळवलेले हे एकमेव महाविद्यालय आहे. या उपक्रमाच्या मान्यतेसाठी व प्रस्ताव सादरीकरणासाठी प्रकल्प समन्वयक प्रा. हेमंत पाटील, सह-समन्वयक डॉ. राहुल चव्हाण, डॉ. अमोल देठे, डॉ. विद्या हिंगे, डॉ. योगेश भगत आदींनी मोलाचे योगदान दिले. 

प्राप्त होणाऱ्या निधीचा विद्यार्थ्यांना संशोधनासाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करून देशाच्या कृषी विकासासाठी अधिक सक्षम व कौशल्यपुर्ण मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यात येईल, अशी अपेक्षा कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com