Agriculture news in Marathi, College starts in Jammu and Kashmir, students absent | Page 2 ||| Agrowon

जम्मू-काश्‍मीरमध्ये महाविद्यालय सुरू, विद्यार्थी गैरहजर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

श्रीनगर, जम्मू-काश्‍मीर : कलम ३७० हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद असलेले महाविद्यालय आज सुरू झाले. मात्र विद्यार्थी हजर न राहिल्याने प्रशासनाच्या प्रयत्नास यश आले नाही. दरम्यान, बुधवारी (ता. ९) ६६ व्या दिवशीही श्रीनगर शहरातील बहुतांश भागातील बाजारपेठ बंदच होती. 

श्रीनगर, जम्मू-काश्‍मीर : कलम ३७० हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद असलेले महाविद्यालय आज सुरू झाले. मात्र विद्यार्थी हजर न राहिल्याने प्रशासनाच्या प्रयत्नास यश आले नाही. दरम्यान, बुधवारी (ता. ९) ६६ व्या दिवशीही श्रीनगर शहरातील बहुतांश भागातील बाजारपेठ बंदच होती. 

जम्मू आणि काश्‍मीरचे विभागीय आयुक्त बशीर खान यांनी गेल्या आठवड्यात शाळा ३ ऑक्‍टोबर रोजी आणि महाविद्यालय ९ ऑक्‍टोबर रोजी सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज सकाळी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली, मात्र विद्यार्थी कॉलेजकडे फिरकले नाहीत. प्रशासनाने व्यापक पातळीवर प्रयत्न करूनही आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था असतानाही काश्‍मिरी महाविद्यालयीन विद्यार्थी घरीच बसले. 

यादरम्यान प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात पाठविण्यासंदर्भात पालकांनाही आवाहन करण्यात आले होते. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे काश्‍मीर खोऱ्यातील जनजीवन ६६ व्या दिवशीही विस्कळितच राहिले. खासगी वाहनांची वाहतूक बंदच होती पण जहॉंगीर चौकात काही प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली. काही ठिकाणी सकाळी ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू होती. त्यानंतर बाजारपेठेत शुकशुकाट झाला. 

दुकाने बंद असल्याची फेरीवाल्यानी संधी साधली. रेसिडेन्सी रोड आणि पोलो विव भागात फेरीवाले दिसून आले. खोऱ्यात लॅंडलाइन सेवा खोऱ्यातील सुरू आहे. त्याचबरोबर मोबाइल सेवा काही भागात सुरू असून, इंटरनेट सेवा अद्याप बंदच ठेवण्यात आली आहे. 

कृष्णाघाटीत पाकचा गोळीबार 
पूँच जिल्ह्यातील सीमेलगत कृष्णाघाटी सेक्‍टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. या वेळी भारतानेही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख उत्तर दिले. या गोळीबारामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण झाले. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, गेल्या दहा महिन्यांत २ हजार ५० वेळेस भारतीय सीमेवर गोळीबार केला आहे. त्यात २१ भारतीयांचा मृत्यू झाला आहे.
 

इतर बातम्या
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर :...‘लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची झापड चढविण्यात...
वीजग्राहकांच्या समस्यांबाबत भूमिका...मुंबई ः राज्यातील महावितरण कंपनीच्या...
सोलापुरातील ६९५ दूध संस्थांना नोटिसासोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला दूध...
एचएएल कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी बेमुदत...नाशिक  : प्रलंबित वेतन करारासह इतर...
आटपाडी तालुका पाऊस, ‘टेंभू’मुळे पाणीदारसांगली : आटपाडी तालुक्यात टेंभूच्या योजनेचे...
सांगलीतील निवडणूक प्रचारात शेती प्रश्‍न...सांगली: विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगू...
कर्जफेडीची क्षमता देणाऱ्या धोरणांची गरजविधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राजकीय...
महामंडळाने ‘उद्योग’ बंद केले तरच विकासराज्यातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी ‘...
हजारो नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चवनाशिक : आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या विषमुक्त...
`मी काय केले, हे विचारणाऱ्या अमित...कन्नड जि. औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व...
नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर...नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे...जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात...
नवरात्रोत्सवात पुणे बाजारसमितीत फुलांची...पुणे  ः नवरात्र आणि दसऱ्याला पुणे बाजार...
वैविध्यपूर्ण विचारांनी विद्यार्थी...परभणी : ‘‘विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतिक, भाषिक व...