agriculture news in Marathi color cotton production affeted by less research Maharashtra | Agrowon

मर्यादित संशोधनामुळे रंगीत कापसाचा बेरंग 

विनोद इंगोले
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी संकरित, सुधारित वाणांचा अभाव आणि इतर तांत्रिक कारणांमुळे दिवास्वप्न ठरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी संकरित, सुधारित वाणांचा अभाव आणि इतर तांत्रिक कारणांमुळे दिवास्वप्न ठरण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून ‘वैदेही’ या रंगीत कापसाच्या सरळ वाणाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या वाणातील तांत्रिक दोष दूर करून सुधारित वाणाची उपलब्धता किंवा त्यासाठीचे संशोधन त्यापूर्वी व्हावे, अशी अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्‍त केली गेली आहे. 

देशांतर्गत व आंतरराष्ट्रीयस्तरावर नैसर्गिक रंगधारणा असलेल्या कापसाला भविष्यात मागणी राहील, अशी अपेक्षा केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर) तसेच केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेला (सिरकॉट) आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून रंगीत कापसाची लागवड, उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया करून धागा व कापड तयार करण्यावर भर दिला गेला आहे. मात्र वैदेही हे सरळ वाण असल्याने त्याची उत्पादकता संकरित वाणाच्या तुलनेत अत्यल्प आहे.

संकरित पांढऱ्या कापसाचे १२ ते १४ क्‍विंटलपर्यंत उत्पादन होते. याउलट रंगीत कापसाचे उत्पादन ८ ते ९ क्‍विंटलच मिळते. फायबर लेंथ, मायक्रोलेयर आणि स्ट्रेंथ या बाबतीही रंगीत कापूस पिछाडीवर आहे. स्ट्रेंथ नसल्याने कापड विणायचा असल्यास त्यात पांढऱ्या धाग्यांची सरमिसळ करावी लागते. स्ट्रेंथ न मिळाल्यास कापसापासून कापडाची प्रक्रिया होऊ शकत नाही.

अशाप्रकारच्या तांत्रिक अडचणी पहिल्याच टप्प्यात समोर आल्या आहेत. त्यामुळे संस्थेने सुधारित, संकरित वाणाच्या संशोधनावर भर देत त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, असा सूर आळवला जात आहे. त्यासोबतच रंगीत आणि पांढऱ्या कापसाचे क्रॉस परागीकरण होत त्यातून मोठा धोका भविष्यात ओढवण्याची भीती देखील जाणकारांनी व्यक्‍त केली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर...नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील...
उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या...
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...