Agriculture news in Marathi Commander-in-Chief dies in helicopter crash | Agrowon

सरसेनाध्यक्ष हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्युमुखी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 डिसेंबर 2021

तमिळनाडूमध्ये लष्करी हेलिकाॅप्टरला बुधवारी (ता. ८) झालेल्या भीषण अपघातात चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जण मृत्यूमुखी पडले आहेत.

नवी दिल्ली ः तमिळनाडूमध्ये लष्करी हेलिकाॅप्टरला बुधवारी (ता. ८) झालेल्या भीषण अपघातात चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांमध्ये बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचाही समावेश आहे. तर ग्रुप कॅप्टन विक्रम सिंह हे गंभीर जखमी असून, चेन्नईच्या लष्करी रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, संरक्षण क्षेत्राला हादरविणाऱ्या या घटनेबाबत केंद्र सरकारतर्फे उद्या संसदेमध्ये निवेदन सादर केले जाणार आहे. तर हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त झाल्यानंतर जनरल रावत यांची २०१९ मध्ये देशाच्या पहिल्यावहिल्या सरसेनाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. लष्कर, हवाईदल आणि नौदल या तिन्ही सेनादलांच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने या पदाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडे डिपार्टमेन्ट आॅफ मिलिट्री अफेयर्स या विभागाचेही प्रमुखपद सोपविण्यात आले होते. 

दिवंगत सरसेनाध्यक्ष रावत यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. जनरल रावत यांच्या हेलिकाॅप्टरला अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर केंद्र सरकारच्या पातळीवर तातडीने उच्चस्तरीय सूत्रे हलली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह स्वतः या अपघातग्रस्त हेलिकाॅप्टर आणि मदत कार्यावर लक्ष ठेवून होते. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळविण्यात आले.
 


इतर अॅग्रो विशेष
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
लोकाभिमुख उपक्रमांतून लोणीच्या विकासाला...परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...