Agriculture news in Marathi Commencement of direct inputs distribution at Saundad | Agrowon

सौंदड येथे थेट निविष्ठा वितरण उपक्रमाचा प्रारंभ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

गोंदिया ः कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीची अडचण भासू नये याकरिता थेट बांधावर निविष्ठा पुरवठ्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. सडक अर्जुनी तालुक्‍यातील सौंदड येथे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या हस्ते निविष्ठा घेऊन जाणाऱ्या वाहनास हिरवी झेंडी दाखवीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

गोंदिया ः कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना निविष्ठा खरेदीची अडचण भासू नये याकरिता थेट बांधावर निविष्ठा पुरवठ्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. सडक अर्जुनी तालुक्‍यातील सौंदड येथे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांच्या हस्ते निविष्ठा घेऊन जाणाऱ्या वाहनास हिरवी झेंडी दाखवीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. याच काळात खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांची निविष्ठा खरेदीची लगबग वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीत उपाययोजनांचे पालन यामुळे होण्याची शक्‍यता नसल्याचे गृहीत धरून कृषी विभागाने थेट बांधावरच निविष्ठा पोचविण्यास सुरुवात केली आहे. सौंदड येथे आमदार मनोहर चंद्रिकापूर यांनी निविष्ठा घेऊन जाणाऱ्या या वाहनांना हिरवी झेंडी दाखविली.

शिवाजी महारात शेतकरी गट तसेच कन्हय्या कृषी बचतगट या दोन्ही गट मिळून १४.४३ क्‍विंटल धान बियाणे, १६.६६ टन रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या दोन्ही गटांनी एकत्रित बियाणे व खत खरेदी केल्याने कमी दरात ते उपलब्ध झाले आणि वाहतुकीच्या खर्चातही बचत होण्यास मदत झाली आहे. यावेळी सडकअर्जुनी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, मंडळ कृषी अधिकारी प्रतीक्षा मेंढे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राखी कहालकर, कृषी पर्यवेक्षक मनोज भालाधरे, कृषी सहायक वीरेंद्र बिसेन यांच्यासह बचतगटाचे पदाधिकारी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...