सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात खरेदीला प्रारंभ

जिल्ह्यात भात खरेदीला शुक्रवार (ता. १३) पासून प्रारंभ करण्यात आला आहे. निवजे (ता. कुडाळ) येथे खरेदीस सुरुवात करण्यात आली असून जिल्ह्यातील ४३ केंद्रांवर ही खरेदी होणार आहे. प्रतिक्विंटलला २ हजार २०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
Commencement of paddy procurement in Sindhudurg district
Commencement of paddy procurement in Sindhudurg district

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात भात खरेदीला शुक्रवार (ता. १३) पासून प्रारंभ करण्यात आला आहे. निवजे (ता. कुडाळ) येथे खरेदीस सुरुवात करण्यात आली असून जिल्ह्यातील ४३ केंद्रांवर ही खरेदी होणार आहे. प्रतिक्विंटलला २ हजार २०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात भात खरेदी नोव्हेंबरमध्ये सुरू व्हावी, अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी होती. या मागणीनुसार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते.काही दिवसांपूर्वी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि खासदार, आमदार यांच्यामध्ये चर्चा झाली होती. पणन मंडळाकडे पाठपुरावा सुरू होता. त्याला आता यश आले असून पणन हंगाम २०२०-२१ करिता किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील भात खरेदीसाठी जिल्ह्यात ४३ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून भात खरेदी केली जाते. मार्केटिंग फेडरेशनने भाताची साठवणूक करण्यासाठी २० हजार बारदाना जिल्ह्यात पाठविला आहे. दरम्यान आजपासून जिल्ह्यात भात खरेदी करण्यास सुरुवात देखील होणार आहे. कुडाळ तालुक्यातील निवजे येथे आजपासून भातखरेदीला सुरुवात झाली आहे. भाताला प्रतिक्विंटलला २ हजार २०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. तालुका संघ व काही सोसायट्या खरेदी करणार आहेत.

जिल्ह्यात कुडाळ, माणगाव, घोटगे, कडावल, कसाल, निवजे, पणदुर, पिंगुळी, एमआयडीसी कुडाळ, आंब्रड, हिर्लोक, आरोस (ता. कुडाळ) पेंडुर, आचरा, चौके, कट्टा, विरण (ता. मालवण) सावंतवाडी शहर, मळगाव, मडुरा, तळवडे, डेगवे, कोलगाव, मळेवाड इन्सुली, (ता. सावंतवाडी) दोडामार्ग शहर, भेडशी, (ता. दोडामार्ग) कणकवली शहर, कनेडी, फोंडा, तळेरे, खारेपाटण (ता. कणकवली)वेंगुर्ले शहर, शिरोडा, म्हापण, वेतोरे, तुळस, (ता. वेंगुर्ला) देवगड शहर, पडेल, पाटगाव, शिरगाव (ता. देवगड) वैभववाडी शहर, आर्चिणे (ता. वैभववाडी) अशी ४३ भात खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com