पुणे बाजार समितीमध्ये लसीकरणाला प्रारंभ

पुणे बाजार समितीच्या वतीने आणि दि पूना मर्चंट चेंबर्सच्या सहकार्याने हमाल भवन येथे सोमवारपासून (ता. १०) कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सुमारे ३०० बाजार घटकांना लस देण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.
Commencement of vaccination in Pune Bazar Samiti
Commencement of vaccination in Pune Bazar Samiti

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीच्या वतीने आणि दि पूना मर्चंट चेंबर्सच्या सहकार्याने हमाल भवन येथे सोमवारपासून (ता. १०) कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सुमारे ३०० बाजार घटकांना लस देण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. बाजार घटकांमध्ये बाजार समिती कर्मचारी, अडते, दिवाणजी, हमाल, तोलणार आदींचा समावेश आहे.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, दि पूना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सहसचिव विजय मुथा, नगरसेवक प्रवीण चोरबेले, फुलबाजार अडते आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अप्पा गायकवाड, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, अध्यक्ष किसन काळे, आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी रूबल अग्रवाल म्हणाल्या, की शहरात उपलब्धतेनुसार लसीचा पुरवठा आणि लसीकरण केंद्र वाढविली जात आहे. लसीकरणामुळे मृत्युदर कमी होत असून, पॉझिटिव्ह रेट कमी होत आहे. तसेच लसीकरणानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना त्रास कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. आढाव म्हणाले, की लस म्हणजे पूर्णपणे बरे होण्याचे औषध नाही. मात्र कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम लस करते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन काम करावे. सर्वांनी आपल्या घराची साफसफाई करण्याची मोहीम हाती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

गरड म्हणाले, की येथील केंद्रावर प्राधान्याने ४५ वर्षांपुढील बाजार घटकांचे लसीकरण केले जात आहे. त्याबरोबर येथे दवाखाना सुरू केला असून, ताप असल्यास कोरोना तपासणीची सुविधाही उपलब्ध केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com