Agriculture news in Marathi Commencement of vaccination in Pune Bazar Samiti | Page 2 ||| Agrowon

पुणे बाजार समितीमध्ये लसीकरणाला प्रारंभ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 11 मे 2021

पुणे बाजार समितीच्या वतीने आणि दि पूना मर्चंट चेंबर्सच्या सहकार्याने हमाल भवन येथे सोमवारपासून (ता. १०) कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सुमारे ३०० बाजार घटकांना लस देण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.

पुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीच्या वतीने आणि दि पूना मर्चंट चेंबर्सच्या सहकार्याने हमाल भवन येथे सोमवारपासून (ता. १०) कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. सुमारे ३०० बाजार घटकांना लस देण्याची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. बाजार घटकांमध्ये बाजार समिती कर्मचारी, अडते, दिवाणजी, हमाल, तोलणार आदींचा समावेश आहे.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या हस्ते या लसीकरण केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, दि पूना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सहसचिव विजय मुथा, नगरसेवक प्रवीण चोरबेले, फुलबाजार अडते आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अप्पा गायकवाड, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, अध्यक्ष किसन काळे, आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी रूबल अग्रवाल म्हणाल्या, की शहरात उपलब्धतेनुसार लसीचा पुरवठा आणि लसीकरण केंद्र वाढविली जात आहे. लसीकरणामुळे मृत्युदर कमी होत असून, पॉझिटिव्ह रेट कमी होत आहे. तसेच लसीकरणानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना त्रास कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. आढाव म्हणाले, की लस म्हणजे पूर्णपणे बरे होण्याचे औषध नाही. मात्र कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम लस करते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊन काम करावे. सर्वांनी आपल्या घराची साफसफाई करण्याची मोहीम हाती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

गरड म्हणाले, की येथील केंद्रावर प्राधान्याने ४५ वर्षांपुढील बाजार घटकांचे लसीकरण केले जात आहे. त्याबरोबर येथे दवाखाना सुरू केला असून, ताप असल्यास कोरोना तपासणीची सुविधाही उपलब्ध केली आहे.


इतर बातम्या
मराठवाड्यातील उपयुक्त पाण्यात किंचित वाढऔरंगाबाद ः मराठवाड्यातील ८७९ मोठ्या, मध्यम व लघू...
मर्जीतल्या शेतकऱ्यांनाच दिला...सिन्नर, जि. नाशिक :  गेल्या वर्षाच्या खरीप...
बोरामणी विमानतळाच्या  भूसंपादनाचा मार्ग...सोलापूर ः सोलापुरातील बहुचर्चित बोरामणी...
कृषी संजीवनी मोहिमेचा बुलडाणा...बुलडाणा ः कृषी विभागाच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञान...
परसबागेतील कुक्कुटपालन ‘एटीएम’सारखेअकोला : ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांत...
नांदेड जिल्ह्यात पावसाची ओढ; पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरवातीपासून...
मराठवाडी म्हशींचे संवर्धन, विकासासाठी...परभणी ः मराठवाडा विभागामध्ये मोठ्या संख्येने...
‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायमकोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
खामगाव तालुक्यात बंधाऱ्याची निर्मितीबुलडाणा ः ‘सकाळ रिलीफ फंडा’तून खामगाव तालुक्‍...
सोयाबीन पीकविमा घोटाळ्याची चौकशी...अकोला : गेल्या हंगामात सोयाबीन पिकाचे मोठ्या...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
कडा येथे कांद्याचे बनावट बियाणे जप्तनगर ः नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या कडा (ता....
कुंभोजमध्ये बेकायदा  कीटकनाशकाचा साठा...कोल्हापूर : केंद्र शासनाने सुरक्षिततेच्या...
दुधाला कायद्याने संरक्षण देण्यासाठी ‘...पुणे : शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना गाईच्या...
आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींनी आता...नाशिक : ‘‘अठरा पगडजाती, बारा बलुतेदारांना सोबत...
सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे भात...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग चार पाच दिवस...
सांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ, दर...सांगली ः गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे सौदे...