अर्थसंकल्प २०१९ : मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, विरोधकांचे मात्र टीकास्त्र

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन
केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन

केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष दिले आहे. सरकार शेतकऱ्यांप्रती सजग आहे, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांची निराशा करणारा आहे, अशा प्रतिक्रिया विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.   नवभारताची संकल्पना विस्तारणारा अर्थसंकल्प यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताची संकल्पना विस्तारणारा आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातील जनतेच्या आकांक्षांची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. पायाभूत क्षेत्रात १०० लाख कोटी गुंतवणूक करण्याचा निर्णय क्रांतिकारी आहे. अर्थसंकल्पात विशेषत: गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. पुढील दोन ते अडीच वर्षांत ग्रामीण भागात २ कोटी घरे बांधण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सव्वा लाख किलोमीटरचे ग्रामीण रस्ते, बचतगटांसाठी योजना, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या योजनांकरिताही मोठी तरतूद करण्यात आली आहे.                                 - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेणारा अर्थसंकल्प शेतकरी, महिला आणि गाव-शहरांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रबिंदू ठेवून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्‍या उत्‍पन्‍नात दुप्‍पट वाढ करण्‍याचा संकल्‍प असो की २०२२ पर्यंत प्रत्‍येक घरात वीज आणि एलपीजी गॅस पोचविण्‍याचा संकल्‍प असो या माध्‍यमातून सरकारची गरीब व शेतकऱ्यांच्या कल्‍याणाविषयीची सजगता स्‍पष्‍ट होते. - सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री.

हा तर ‘अनर्थ’ संकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प ‘अनर्थ’ संकल्प आहे. पेट्रोल-डिझेलवरील करवाढीचे दुष्परिणाम सर्व क्षेत्रावर जाणवतील. बँकांना दिलेला ७० हजार कोटींचा निधी हा अप्रत्यक्षपणे बड्या कर्जबुडव्यांच्या खिशात जाणार आहे. एकूणच शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ याशिवाय सामान्य जनतेला अर्थसंकल्पातून काहीही मिळालेले नाही.                

- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद.

नाराज करणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महागाईबद्दल महिलांच्या वेदना समजून घेऊन महागाई कमी करण्यासाठी काहीतरी करतील असे अपेक्षित होते. मात्र महागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. शिवाय युवा वर्गालाही नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प गोंधळलेला अर्थसंकल्प वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचे आहे याची स्पष्टता या अर्थसंकल्पात नाही. खरं तर आधीच असलेल्या शेतीशी संबंधित योजनांना भरीव निधी देणे या अर्थसंकल्पातून अपेक्षित होते.  - जयंत पाटील, आमदार, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

निराशा करणारा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांना केंद्रबिंदू मानून देशाची आर्थिक धोरणे तयार केली जातील, असे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र अर्थसंकल्पात ते आश्वासन पाळलेले दिसून येत नाही. हा अर्थसंकल्प धनिकधार्जिणा आणि शेतकरी, मध्यमवर्गीय, गरीब, बेरोजगार, व्यापारी, उद्योजक व ग्रामीण क्षेत्राची निराशा करणारा आहे.      

- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com