agriculture news in marathi commerce minister should interfear in Agri export : Apeda writes a letter | Agrowon

शेतमाल निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालयाने हस्तक्षेप करावा : अपेडाचे पत्र

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

बांग्लादेशमध्ये जाणारा संत्रा पश्‍चिम बंगालमधील संचारबंदीमुळे त्या राज्याच्या सिमेवर थांबविण्यात आल्याने उत्पादकांचे नुकसान होण्याची भिती वर्तविली जात आहे. अपेडाला या संदर्भाने विविध शेतमाल संघाकडून कळविण्यात आल्यानंतर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करावा, असे पत्र अपेडाने दिले आहे. 

नागपूर  ः राज्यात जारी करण्यात आलेल्या संचारबंदीतून शेतमाल वाहतूक वगळण्यात आली आहे. मात्र बांग्लादेशमध्ये जाणारा संत्रा पश्‍चिम बंगालमधील संचारबंदीमुळे त्या राज्याच्या सिमेवर थांबविण्यात आल्याने उत्पादकांचे नुकसान होण्याची भिती वर्तविली जात आहे. अपेडाला या संदर्भाने विविध शेतमाल संघाकडून कळविण्यात आल्यानंतर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने याप्रकरणी हस्तक्षेप करावा, असे पत्र अपेडाने दिले आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाच्या अनेक भागात संचारबंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली आहे. त्याचा फटका संत्र्यासह इतर शेतमालाच्या वाहतूकीला बसला आहे. संत्रापट्टयात मजूरांअभावी संत्रा मंड्या ओस पडल्या आहेत. पोलिसांकडून त्रास होईल या भितीपोटी वाहतूकदारही परवानगी असताना शेतमालाच्या वाहतूकीस तयार होत नसल्यामुळे ही परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे. 

सद्यस्थितीत बांग्लादेशमधून नागपूरी संत्र्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे त्या भागात दरही तेजी आली आहे. २५० ते ३०० टन रोजची निर्यात असलेल्या बांग्लादेशला आता ५५० ते ६०० टन रोज संत्रा पुरवठा होत आहे. बांग्लादेशमध्ये होणारी निर्यात हाच संत्रा उत्पादकांना एकमेव दिलासा आहे. मात्र पश्‍चिम बंगाल सरकारने त्यांच्या सिमेवर सर्वप्रकारची वाहतूक थांबविल्याने संत्रा निर्यातदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संत्रा फळ नाशवंत असल्याने निर्यातदार अधिकच अस्वस्थ झाले आहेत. या निर्यातदारांमध्ये अमरावती जिल्ह्यातील बहूतांश निर्यातदारांचा समावेश आहे. 

दरम्यान, महाऑरेंजचे राहूल ठाकरे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर वेगाने हालचाली होत अडकलेल्या सहा ते सात वाहनांनी बांग्लादेशच्या सिमेत प्रवेश केल्याची माहिती आहे. 

संत्रा, सुगंधी भात वाण, मटण व इतर फळ, भाजीपाल निर्यातदारांनी वाहतूकीची अडचण मांडली आहे. त्या-त्या निर्यातदार संघांकडून अपेडाला पत्र प्राप्त झाली आहेत. ती एकत्रित करुन केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालायाला या विषयात हस्तक्षेप करण्याचे लिहिले आहे.
- प्रशांत वाघमारे, उपमहाव्यवस्थापक, अपेडा


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...