Agriculture news in marathi Commercial banks lag behind in loan disbursement in Hingoli district | Agrowon

हिंगोली जिल्ह्यातील कर्जवाटपात व्यापारी बॅंका पिछाडीवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

हिंगोली : जिल्हा बॅंक पीक कर्जवाटपात आघाडीवर आहे. ग्रामीण बॅंकेने कर्जवाटपात गती घेतली आहे. परंतु, व्यापारी बॅंका मात्र अद्याप पिछाडीवर आहेत.

हिंगोली : जिल्ह्यातील विविध बॅंकांनी गुरुवार (ता.२५) पर्यंत ३३ हजार २७९ शेतकऱ्यांना १६६ कोटी १२ लाख १८ हजार रुपयांचे (१४.२२ टक्के) पीक कर्जवाटप केले. जिल्हा बॅंक पीक कर्जवाटपात आघाडीवर आहे. ग्रामीण बॅंकेने कर्जवाटपात गती घेतली आहे. परंतु, व्यापारी बॅंका मात्र अद्याप पिछाडीवर आहेत. 

जिल्ह्यातील बॅंकांना यंदाच्या खरिपात १ हजार १६८ कोटी ९५ लाख रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात व्यापारी बॅंकांना ८५९ कोटी १० लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १६० कोटी ९६ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १४८ कोटी ८९ लाख रुपयांच्या उद्दिष्टाचा समावेश आहे. 

जिल्हा बॅंकेने आजवर २० हजार ६१५ शेतकऱ्यांना ५१ कोटी ५७ लाख ५९ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. व्यापारी बॅंकांना सर्वाधिक उद्दिष्ट आहे. परंतु, या बॅंकांनी अद्याप पीक कर्जवाटपात गती घेतलेली नाही. व्यापारी बॅंकांनी आजवर ७ हजार ९९४ शेतकऱ्यांना ८२ कोटी २० लाख ९७ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची कर्जवाटपाची गती वाढली आहे. या बॅंकेने आजवर ४ हजार ६७० शेतकऱ्यांना ३२ कोटी ३३ लाख ६३ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप केले. 

बॅंकनिहाय पीक कर्जवाटप (कोटी रुपये

बॅंक शेतकरी संख्या कर्जवाटप टक्केवारी
जिल्हा बॅंक २०६१५ ५१.५७ ३४.६४
व्यापारी बॅंक ७९९४ ८२.२० ९.५६
म.ग्रा.बॅंक ४६७० ३२.३३ २०.०८ 

 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...