Agriculture news in marathi Commercial farming of crops on the dam in Konkan | Agrowon

कोकणात बांधावरच्या पिकांची होणार व्यावसायिक शेती 

अमित गद्रे
बुधवार, 21 एप्रिल 2021

कोकणातील दुर्लक्षित परंतु येत्या काळात आर्थिक आणि प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाच्या फळ, फूल पिकांच्या व्यावसायिक लागवडीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. 

पुणे : कोकणातील दुर्लक्षित परंतु येत्या काळात आर्थिक आणि प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाच्या फळ, फूल पिकांच्या व्यावसायिक लागवडीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. 

प्रकल्पाबाबत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर म्हणाले, की सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिरफळ, वटसोल, वावडिंग, कडीकोकम आणि सुरंगी ही पिके शेती बांधावर, परस बागेत मोठ्या प्रमाणात आहेत. यांचे औषधी आणि प्रक्रियामूल्य लक्षात घेता या दुर्लक्षित पिकांमध्ये व्यावसायिक संधी आहे. हवामान बदलाच्या काळात आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे दुर्लक्षित पिकांची लागवड आणि मूल्यवर्धनाकडेही आम्ही संशोधन प्रकल्प हाती घेतला. दोन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्लक्षित परंतु व्यावसायिक मूल्य असणाऱ्या विविध पिकांची कृषी विभाग, शेतकरी गट आणि लुपीन फाउंडेशनच्या मदतीने नोंदणी पूर्ण केली. 

निरुखे गाव शिवारात जांभळाच्या तीन वैशिष्टपूर्ण जाती मिळाल्या आहेत. त्यांची कलमे तयार केली असून, विद्यापीठ प्रक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या शेतावर लागवड झाली आहे. विद्यापीठाने दुर्लक्षित पिकांच्या संवर्धनासाठी समूह शेती प्रकल्प हाती घेतला आहे. यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे दुर्लक्षित झालेली पिके येत्या काळात आर्थिक उत्पन्नाचे साधन ठरतील. रायगड जिल्ह्यात पपनस, नीरफणस आणि रामफळाच्या लागवडीला संधी आहे. या पिकांच्या नवीन जातींबाबतही संशोधन सुरू आहे. 

पिकांचे महत्त्व 

  • तिरफळाचे बी आणि कवच हे मसाला आणि औषधी गुणधर्माचे. 
  • वटसोलाच्या फोडी वाळवून आमसुलासारखा वापर. 
  • वावडिंग आणि कडीकोकम फळांचा औषधीनिर्मितीमध्ये वापर. 
  • सुरंगी फुलांना अत्तर निर्मितीसाठी मागणी. 

विद्यापीठाने सुरंगी, वटसोल, तिरफळाची जातिवंत अधिक उत्पादन देणारी झाडे निवडून कलमे तयार केली. ही कलमे संशोधन प्रक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या शेतावर लावण्यात आली आहेत. वावडिंगाच्या बी रुजविण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या पिकांच्या वाढीचा अभ्यास सुरू आहे.
- डॉ. पराग हळदणकर, 
संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली 

कोकणपट्टीत मामफळ, सुरंगी, नागकेशर, वटसोल ही दुर्लक्षित पिके आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. अभ्यासू शेतकऱ्यांनी ही झाडे बांधावर जपली आहेत. व्यावसायिक आणि आर्थिक मूल्य असणाऱ्या या पिकांबाबत कृषी विद्यापीठ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्रितपणे लागवडीचे प्रयोग केले तर संशोधन आणि विस्ताराला चालना मिळेल. 
- मिलिंद पाटील, पिंगोळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग 
 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...