कडवंची परिसरात व्यापारी द्राक्ष खरेदीला धजावेना

जालना : आधी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या द्राक्षांना घेण्यास व्यापारीच धजावत नसल्याने आता या द्राक्षांच करावं तरी काय असा प्रश्न कडवंचीसह परिसरातील द्राक्ष उत्पादकांसमोर उभा आहे. या मधून मार्ग काढण्यासाठी वाहतूक परवाने मिळवून व्यापाऱ्यांचा खरेदीचा मार्ग मोकळा करावा. तसेच त्यांच्याकडून किमान खर्च वसूल होईल असे दर मिळविण्यासाठी द्राक्ष उत्पादकांनी प्रयत्न चालविले आहेत.
Commercial grapes should not be purchased in the kadwanchi area
Commercial grapes should not be purchased in the kadwanchi area

जालना : आधी नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या द्राक्षांना घेण्यास व्यापारीच धजावत नसल्याने आता या द्राक्षांच करावं तरी काय असा प्रश्न कडवंचीसह परिसरातील द्राक्ष उत्पादकांसमोर उभा आहे. या मधून मार्ग काढण्यासाठी वाहतूक परवाने मिळवून व्यापाऱ्यांचा खरेदीचा मार्ग मोकळा करावा. तसेच त्यांच्याकडून किमान खर्च वसूल होईल असे दर मिळविण्यासाठी द्राक्ष उत्पादकांनी प्रयत्न चालविले आहेत.

मराठवाड्यातील सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्र असलेल्या जालना तालुक्यातील कडवंचीसह परिसरातील द्राक्ष उत्पादकांसमोर संकटाचा ढीग कायम आहे. यंदा द्राक्षावर निसर्गाची कायम अवकृपा राहिली. आधी एकूण क्षेत्रापैकी जवळपास ३० ते ४० टक्के द्राक्ष बागा प्रतिकूल हवामानामुळे फुटल्याच नाही. ज्या फुटल्या त्यावरही पाऊस व प्रतिकूल हवामानाचे संकट कायम राहिल्याने उत्पादकांचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला. 

मोठ्या मेहनतीने द्राक्ष उत्पादन घेतले तर मार्चच्या १७ ते १८ तारखेला झालेल्या गारपीट व अवकाळी पूर्वमोसमी फटका बसला. ते संकट झेलूनही द्राक्षाचे उत्पादन घेणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जवळपास ४० टक्के बागा कोरोनामुळे उद्भवलेल्या  संकटात सापडल्या आहेत. 

कडवंची परिसरात जवळपास ५० ते ६० व्यापारी खरेदी केलेले द्राक्ष मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी पाठवितात. परंतु अलीकडच्या चार दोन दिवसात हे व्यापारीच खरेदीसाठी फिरकत नसल्याने द्राक्ष विक्रीचे संकट  उत्पादकांसमोर उभे ठाकले आहे. उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार एकदम विक्रीसाठी तयार असलेली जवळपास ७ हजार क्विंटल द्राक्ष इतर राज्यातील बाजारपेठेत पाठवायची कशी हा प्रश्न आहे. 

कंडवंचीसह नंदापूर, धारकल्यानं, वरुड, नाव्हा आदी गावशिवरतील किमान ४० टक्के बागा उत्पादनाच्या उंबरठ्यावर आहेत. या भागांमधील हजारो टन उत्पादित द्राक्षाचा इतर राज्यात मोठी मागणी असली तरी ते तिथपर्यंत पाठवावे कसे, त्यासाठी व्यापारी येईल कोण हा प्रश्न द्राक्ष उत्पादकांसमोर आहे. 

या संकटाआधी उत्पादित व विक्री झालेल्या द्राक्षाला ५० रुपयांपर्यंत प्रतिकिलोला दर मिळाला. आता मात्र खरेदी करणारे सौदे सोडून देत आहेत. कोणी खरेदीची तयारी दाखविली तरी १५ ते २५ रुपये प्रतिकिलोपेक्षा दर मोजायला तयार नसल्याची किंवा खरेदी केलेल्या द्राक्षाला इतर राज्यात पाठवून विक्री केल्यानंतर जो दर मिळेल त्या तुलनेत दर देऊ असे सांगत असल्याची माहिती द्राक्ष उत्पादकांनी दिली. 

मोठ्या प्रमाणात उत्पादन, जालना -सिंदखेडराजा रस्त्यावर तसेच जालना परिसरातील विविध रस्त्यावर बसून होणारी विक्रीही थांबली. शिवाय इतर राज्यातील बाजारपेठेत पाठविण्यासाठी ठोक विक्रीची व्यवस्था सर्वस्वी व्यापारीवर्गावर अवलंबून असल्याने कोरोनामुळे अचानक उद्भवलेल्या संकटाने उत्पादकांच्या संकटात भरच पडली आहे.

आमच्या परिसरातील ४० टक्के बागांमध्ये द्राक्ष उत्पादनाच्या उंबरठ्यावर आहेत. येत्या तीन चार दिवसांत त्यांच्या विक्रीची सोय न लागल्यास मोठ नुकसान होईल.आधी नैसर्गिक आपत्ती अन आता कोरोनामुळे निर्माण झालेल संकट यामुळे आमचे द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत. - चंद्रकांत क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक तथा सरपंच, कडवंची, जि. जालना.

परवाने मिळविण्यासाठी धावपळ व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीसाठी गावशिवारातील बागांमध्ये यावे. यासाठी द्राक्ष उत्पादकांची धडपड सुरू झाली आहे. त्यासाठी कृषी, महसूल व आरटीओ विभागाकडून वाहतूक परवाने मिळविण्याचा प्रयत्न द्राक्ष उत्पादकांनी चालविला होता. आरटीओ कार्यालयाकडून जिल्हाभरातून आलेल्या शेतमाल विक्री इच्छुक जवळपास आठ जणांना गुरुवारी (ता. २६) वाहतूक परवाने देण्यात आले. तर शुक्रवारी (ता. २७) जवळपास १० जणांनी परवान्यासाठी अर्ज केले. ऑनलाइनही परवान्यासाठी अर्ज सुरूच असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातही सारखीच स्थिती औरंगाबाद जिल्ह्यातील सटाणा, दरकवाडी, जयपूर, शेलुद, पिंपरी राजा, हिवरा, टोनगाव आदी गावात जवळपास ५० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावरील बागामधील द्राक्ष विक्रीच्या प्रतिकक्षेत आहेत. बेदाणा करण्याची सोय नाही व तसे व्यवस्थापनही केलेले नाही. व्यापारी २० रुपये प्रतिकिलोपुढे जायला तयार नाही. त्यामुळे द्राक्षाचे करावं काय हा प्रश्न आमच्यासमोर असल्याचे शेतकरी शिवाजी घावटे व जगन्नाथ वाघ यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com