जलयुक्तच्या धर्तीवर वनयुक्त शिवार राबवा ः मुनगंटीवार

जलयुक्तच्या धर्तीवर वनयुक्त शिवार राबवा ः मुनगंटीवार
जलयुक्तच्या धर्तीवर वनयुक्त शिवार राबवा ः मुनगंटीवार

नाशिक : पर्यावरण संवर्धनांतर्गत पशुपक्ष्यांचे संरक्षण करणे व रक्षण करणेदेखील आवश्यक आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्वक प्रयत्न करावेत. जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या धर्तीवर वनयुक्त शिवार अशा नावीण्यपूर्ण कल्पना राबवाव्यात, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित १६ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते. ३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल करणे आवश्यक असून, या कार्यक्रमात जनतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो वाढविण्यासाठी वनविभागामार्फत योग्य ते नियोजन करण्यात यावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. या परिषदेप्रसंगी प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) उमेश अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) अनुराग चौधरी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. राम बाबू यांच्यासह अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य वनसंरक्षक उपस्थित होते. वनविभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ग्रीन आर्मीच्या सदस्यांमार्फत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी या वेळी दिल्या. या बैठकीअंतर्गत वनविभागाच्या राज्यातील ११ विभाग प्रमुखांनी तयार केलेला विभागनिहाय ३३ कोटी वृक्षलागवडीच्या नियोजनाच्या  कामाचा अहवाल सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्रिमहोदयांच्या हस्ते वनविभागाच्या विविध पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. त्यासोबत महाराष्ट्र फॉरेस्ट जीओ पोर्टल या संकेतस्थळाचे उद्‍घाटन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com