agriculture news in marathi Committed to empowerment of women farmers: Agriculture Minister Bhuse | Agrowon

महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध : कृषिमंत्री भुसे

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 जानेवारी 2021

नाशिक : ‘‘पिकांच्या नियोजनापासून ते विक्रीपर्यंत शेतीच्या संपूर्ण व्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका महिला शेतकरी बजावतात. त्यांच्या सन्मानाबरोबरच सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

नाशिक : ‘‘शेती व शेतीच्या व्यवस्थापनात महिलांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. महिलांच्या सक्रिय सहभागाशिवाय शेती उत्पादन व शेतीचा विकास होऊ शकत जिल्हास्तरीय प्रचार, प्रसिद्धी मेळावा 
नाही. तरीही बहुतांश शेतजमिनीची मालकी पुरुषांच्या नावे आहे. पिकांच्या नियोजनापासून ते विक्रीपर्यंत शेतीच्या संपूर्ण व्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका महिला शेतकरी बजावतात. त्यांच्या सन्मानाबरोबरच सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे,’’ असे प्रतिपादन  कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.

बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भुसे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रचार व प्रसिद्धी मेळावा मालेगाव कॅम्प येथे झाला.
ज्येष्ठ महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. पौष्टिक तृणधान्य भित्तिपत्रकाचे अनावरण या वेळी करण्यात आले.

माती नमुने तपासणी केंद्र, कांदा पेरणी यंत्र, मका सोलणी यंत्र, विकेल ते पिकेल स्टॉलचा समावेश होता. अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी परंपरांना फाटा देण्यासाठी डॉ. प्रतिभा जाधव यांनी उपस्थितांना समुपदेशन केले. 

महिला अधिक मेहनती

अनेक ठिकाणी महिला शेतकरी शेतीसह पूरक उद्योगात चोख भूमिका पार पाडताना दिसतात. महिला पुरुषांपेक्षा अधिक मेहनती, व्यवहारिक आहेत. त्यांना मिळणारे दुय्यम स्थान ही खेदाची बाब आहे. ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे.  निदान ज्या महिला स्वतः जमीनधारक आहे, त्यांच्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प मालेगाव तालुक्यात राबविण्याची संकल्पना मांडली. ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण अभियान’ या प्रकल्पात शेती विषयक सर्व बाबींचा समावेश आहे. हा प्रकल्प शासनास मंजुरीसाठी सादर केल्याचे भुसे यावेळी म्हणाले.
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात अवकाळीचा १०८ हेक्टरवरील...पुणे : पुणे जिल्ह्यात १८ आणि १९ फेब्रुवारीला खेड...
खानदेशात कांदा काढणी लवकरच सुरू होणार जळगाव : खानदेशात कांद्याची लागवड सुमारे १८ हजार...
सातबारा, आठ ‘अ’च्या अधिकारासह पंतप्रधान...नाशिक : केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध...
क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी सातारा...सातारा : जिल्ह्यातील नदीकाठी क्षारपड जमिनी...
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वी ...मुंबई : ‘‘मराठा आरक्षणाचा लढा हा आता अंतिम...
विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या...सोलापूर ः पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव...
महावितरणचे राज्यात आता 'कृषी ऊर्जा...सोलापूर ः राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण-...
...त्यानंतर वैधानिक मंडळे घोषित करू : ...मुंबई : ‘‘ज्या दिवशी राज्यपाल नियुक्त बारा...
मानोलीत रब्‍बी ज्‍वारीची पीक प्रात्‍...परभणी ः ‘‘आहारात ज्‍वारीच्‍या भाकरीस पोषणाच्‍या...
शेळ्या-मेंढ्यांना आधुनिक औषधोपचाराची...अकोला ः भारतातील बहुसंख्य अल्पभूधारक व भूमिहीन...
रानवाडी प्रकल्पाचा वनवास केव्हा संपणार?जलालखेडा, जि. नागपूर : नरखेड तालुक्यामधील पंचायत...
उन्हाळ्यासाठी चारवेळा मिळणार ‘इसापूर’चे...नांदेड : जिल्ह्याला वरदान ठरलेला ऊर्ध्व पैनगंगा...
भातगाव येथे आंबा, काजूची बाग होरपळलीगुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील भातगाव येथे...
‘रोहयो’तून डाळिंब लागवडीच्या...आटपाडी, जि. सांगली ः आटपाडी तालुक्‍यात तालुका...
ताकारी योजनेच्या दुसऱ्या वितरिकेची...देवराष्ट्रे, जि. सांगली ः ताकारी योजनेच्या...
नगरला शेवगा, वांग्यांचे दर टिकून;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
शाश्वत शेतीसाठी रेशीम उद्योग उपयुक्त ः...जालना  : ‘‘मराठवाड्यातील शाश्वत शेतीसाठी...
औषधी वनस्पतींनी वाढवा प्रतिकारशक्तीभारत हा औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे आगार आहे....
शेतकरी नियोजन : पशूपालनआम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दूध व्यवसाय...
आठवडी बाजार बंदचा भाजीपाला उत्पादकांना...जळगाव : खानदेशात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहत...