भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
ताज्या घडामोडी
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध : कृषिमंत्री भुसे
नाशिक : ‘‘पिकांच्या नियोजनापासून ते विक्रीपर्यंत शेतीच्या संपूर्ण व्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका महिला शेतकरी बजावतात. त्यांच्या सन्मानाबरोबरच सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
नाशिक : ‘‘शेती व शेतीच्या व्यवस्थापनात महिलांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. महिलांच्या सक्रिय सहभागाशिवाय शेती उत्पादन व शेतीचा विकास होऊ शकत जिल्हास्तरीय प्रचार, प्रसिद्धी मेळावा
नाही. तरीही बहुतांश शेतजमिनीची मालकी पुरुषांच्या नावे आहे. पिकांच्या नियोजनापासून ते विक्रीपर्यंत शेतीच्या संपूर्ण व्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका महिला शेतकरी बजावतात. त्यांच्या सन्मानाबरोबरच सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त भुसे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय प्रचार व प्रसिद्धी मेळावा मालेगाव कॅम्प येथे झाला.
ज्येष्ठ महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. पौष्टिक तृणधान्य भित्तिपत्रकाचे अनावरण या वेळी करण्यात आले.
माती नमुने तपासणी केंद्र, कांदा पेरणी यंत्र, मका सोलणी यंत्र, विकेल ते पिकेल स्टॉलचा समावेश होता. अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी परंपरांना फाटा देण्यासाठी डॉ. प्रतिभा जाधव यांनी उपस्थितांना समुपदेशन केले.
महिला अधिक मेहनती
अनेक ठिकाणी महिला शेतकरी शेतीसह पूरक उद्योगात चोख भूमिका पार पाडताना दिसतात. महिला पुरुषांपेक्षा अधिक मेहनती, व्यवहारिक आहेत. त्यांना मिळणारे दुय्यम स्थान ही खेदाची बाब आहे. ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे. निदान ज्या महिला स्वतः जमीनधारक आहे, त्यांच्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प मालेगाव तालुक्यात राबविण्याची संकल्पना मांडली. ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण अभियान’ या प्रकल्पात शेती विषयक सर्व बाबींचा समावेश आहे. हा प्रकल्प शासनास मंजुरीसाठी सादर केल्याचे भुसे यावेळी म्हणाले.