Agriculture news in marathi The committee closed for three days in a row | Agrowon

सलग तीन दिवसांवर समिती बंदला तंबी 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 एप्रिल 2021

बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी होण्यासह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ‘ॲग्रोवन’ने हा प्रकार समोर आणला होता. 

नाशिक : मार्चअखेर विविध कारणे सांगून बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी होण्यासह कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ‘ॲग्रोवन’ने हा प्रकार समोर आणला होता. ही बाब पणन संचालनालयाने गांभीर्याने घेत बाजार समित्यांमध्ये तीन किंवा तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी कामकाज बंद राहणार नाही, या आशयाचे परिपत्रक काढले आहे. त्यातून पणन संचालक सतीश सोनी यांनी राज्यातील बाजार समित्यांची कानउघाडणी केली आहे. 

काही बाजार समित्या धार्मिक सण, उत्सव आणि जोडून आलेल्या साप्ताहिक सुट्ट्या यामुळे सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी कामकाज बंद ठेवतात. तर काही बाजार समित्यांमध्ये यात्रा, अमावास्या, व्यापाऱ्यांचा दौरा, आर्थिक वर्षअखेरचा दिवस, विवाह समारंभ तर ‘मार्च अखेर’ सांगून २ ते 
३ दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी कामकाज बंद ठेवतात. 

बाजार समित्या अधिक दिवस बंद राहिल्यामुळे शेतीमालाचे नुकसान, दरात घसरण यासह पुरवठा साखळीवरही परिणाम होतो. तर ग्राहकांना वाढीव दराने शेतीमाल खरेदी करावा लागतो. पुन्हा कामकाज सुरू होऊन आवक वाढून दर पडल्याने शेतकऱ्यांचेच नुकसान होते. लिलावाचे विनियमन व देखरेख करण्याचे बाजार समित्यांचे कर्तव्य असताना त्यास हरताळ फासत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे परिपत्रक काढून राज्यातील बाजार समित्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. हा आदेश व्यापाऱ्यांच्या संदर्भात असल्याने माथाडी व ट्रान्स्पोर्ट घटकाला पण यात समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांची असल्याचे समजते. 

बाजार समित्यांना केलेल्या सूचना 

  • - बाजार समितीने वर्षाच्या सुरुवातीलाच साप्ताहिक सुट्ट्या तसेच 
  • इतर सुट्ट्या जाहीर कराव्यात. सुट्ट्यांचे वर्षभराचे दिवस निश्‍चित करावेत 
  • - शेतीमाल खरेदी- विक्रीचे सौदे करण्याचा कालावधीही निश्‍चित करून पुरेसा वेळ दिला जावा. 
  • - आगामी वर्षाचे कॅलेंडर तयार करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांची ३१ मार्च पूर्वी मान्यता घ्यावी 
  • - अचानक काही कारणांसाठी बाजार बंद ठेवणे आवश्यक असल्यास, त्याबाबत पूर्वसूचना देण्यात याव्यात. 
  • - व्यापाऱ्यांचे वैयक्तिक कारण असेल, तर संबंधित व्यापारी सुट्टी घेऊ शकेल. परंतु कोणत्याही परिस्थितीत सर्व व्यापारी एकाच दिवशी शेतीमाल खरेदीचे व्यवहार बंद ठेवणार नाहीत. 
  • - सुट्टीच्या दिवसाव्यतिरिक्त इतर दिवशी व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्यास अशा व्यापाऱ्यांवर बाजार समितीने त्वरित कारवाई करावी. तसेच बाजार चालू राहील यासाठी पर्यायी व्यवस्था बाजार समितीने करावी. 
  • - शेतीमाल खरेदी, विक्री सौदे बंद असल्याचे दिवस वर्षाच्या सुरुवातीलाच जाहीर करून त्याबाबत सूचना प्रसिद्ध कराव्यात. 

जिल्हा उपनिबंधकांची मान्यता आवश्यक 
बाजार समितीने वर्षभराच्या नियोजनाबाबत ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिका, तहसील, पंचायत समिती यांचे कार्यालयासदेखील सूचित करण्यात यावे. बाजार समित्यांनी आर्थिक वर्ष सन २०२१-२२ च्या सुट्ट्यांबाबत ३० एप्रिल २०२१ पर्यंत संबधित जिल्हा उपनिबंधक यांची मान्यता घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कार्यवाहीबाबतचा जिल्हानिहाय अहवाल जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी दरवर्षी १० एप्रिलपर्यंत सादर करावा लागणार आहे. 

बाजार समित्या या शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी असून कायद्याचे पालन करण्यास बांधील आहेत. जर त्यांनी सूचनांचे पालन केले नाही तर नियमनाच्या कायद्याने कारवाई करू. जर कुणाला यात त्रुटी वाटल्यास सूचना आल्यानंतर त्यास दुरुस्त्या करू. मात्र शेतकऱ्याच्या शेतीमाल विक्रीत अडचणी येणार नाही हे महत्त्वाचे राहील. अनेक बाजार समित्यांनी आठ दिवस कामकाज बंद ठेवले हे शासनाला मान्य नाही. 
- सतीश सोनी, पणन संचालक 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर...नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील...
उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या...
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...