शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात निकषांसाठी समिती

कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) देशातील शेतीमाल आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीचे निकष आणि धोरण निश्‍चित करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात निकषांसाठी समिती
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात निकषांसाठी समिती

पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) देशातील शेतीमाल आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीचे निकष आणि धोरण निश्‍चित करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती शेतीमाल आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठीचे धोरण आणि त्यांचे निकष काय असावेत, या बाबतच्या शिफारशी करून, शिफारशींची अंमलबजावणी आणि निर्यात वृद्धीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. या समितीत साताऱ्यातील पशुचिकित्सक डॉ. प्रशांत योगी यांची निवड झाली आहे. ‘अपेडा’ने देशातील शेतीमालाची, दुग्धजन्य पदार्थांची, नैसर्गिक उत्पादनांसह पोषणमूल्य युक्त उत्पादनांची निर्यात वाढावी, यासाठी संबंधित उत्पादनाचे निकष काय असावेत. त्या बाबतचे दिशानिर्देश निश्‍चित करण्यासाठी. शेतीमालाची काढणीपूर्व आणि काढणी  नंतरची प्रक्रिया काय असावी. नैसर्गिक शेती आणि शेती पर्यावरण विषयक दिशानिर्देश ठरविण्यासाठी. नैसर्गिक उत्पादनांची जबाबदार आणि निश्‍चित साखळी कशी असावी आणि नैसर्गिक उत्पादनाच्या निर्यात वृद्धीसाठी निश्‍चित धोरण ठरविण्यासाठी या समितीची स्थापना केली आहे.    ...अशी आहे समिती व्ही. के. विद्यार्थी (महाव्यवस्थापक अपेडा), डॉ. सासवस्ती बोस (उपमहाव्यवस्थापक), राममूर्ती नारायण (शेतकरी), सुंदरामन (शेतकरी), हुकूमचंद (शेतकरी), नंदा कुमार काशा (शेतकरी आणि आयटी), डॉ. सुनीता टी पांण्डे (प्राध्यापक, संशोधक आयुर्वेद), ॲड. आशिष सोनावणे (आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ज्ञ), डॉ. प्रशांत योगी (पशू चिकित्सक, नॅचरोपॅथी), एस. चंद्रशेखरन (व्यापार तज्ज्ञ).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com