agriculture news in marathi Committee established for Agricultural, Dairy Export Criteria | Page 4 ||| Agrowon

शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात निकषांसाठी समिती

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) देशातील शेतीमाल आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीचे निकष आणि धोरण निश्‍चित करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे

पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) देशातील शेतीमाल आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीचे निकष आणि धोरण निश्‍चित करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती शेतीमाल आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठीचे धोरण आणि त्यांचे निकष काय असावेत, या बाबतच्या शिफारशी करून, शिफारशींची अंमलबजावणी आणि निर्यात वृद्धीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. या समितीत साताऱ्यातील पशुचिकित्सक डॉ. प्रशांत योगी यांची निवड झाली आहे.

‘अपेडा’ने देशातील शेतीमालाची, दुग्धजन्य पदार्थांची, नैसर्गिक उत्पादनांसह पोषणमूल्य
युक्त उत्पादनांची निर्यात वाढावी, यासाठी संबंधित उत्पादनाचे निकष काय असावेत. त्या बाबतचे दिशानिर्देश निश्‍चित करण्यासाठी. शेतीमालाची काढणीपूर्व आणि काढणी 
नंतरची प्रक्रिया काय असावी. नैसर्गिक शेती आणि शेती पर्यावरण विषयक दिशानिर्देश ठरविण्यासाठी. नैसर्गिक उत्पादनांची जबाबदार आणि निश्‍चित साखळी कशी असावी आणि नैसर्गिक उत्पादनाच्या निर्यात वृद्धीसाठी निश्‍चित धोरण ठरविण्यासाठी या समितीची स्थापना केली आहे. 

  ...अशी आहे समिती
व्ही. के. विद्यार्थी (महाव्यवस्थापक अपेडा), डॉ. सासवस्ती बोस (उपमहाव्यवस्थापक), राममूर्ती नारायण (शेतकरी), सुंदरामन (शेतकरी), हुकूमचंद (शेतकरी), नंदा कुमार काशा (शेतकरी आणि आयटी), डॉ. सुनीता टी पांण्डे (प्राध्यापक, संशोधक आयुर्वेद), ॲड. आशिष सोनावणे (आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ज्ञ), डॉ. प्रशांत योगी (पशू चिकित्सक, नॅचरोपॅथी), एस. चंद्रशेखरन (व्यापार तज्ज्ञ).


इतर ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी...
परभणी जिल्ह्यात खतांची मागणी वाढलीपरभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत...
पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावलेपुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका...
नगर जिल्ह्यात साडेपाच हजार शेतकऱ्यांना...नगर ः राज्य सरकारच्या धोरणानुसार महात्मा जोतिराव...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘बळिराजा’च्या...सांगली : ‘एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे’, ‘या...
सरकारने कोंबड्या जगविण्यासाठी शेतकरी...यवतमाळ : केंद्र सरकारने कोंबड्यांना खाद्य...
अंजीर बाग एकदम ‘हेल्दी’ आहे......सोमेश्‍वरनगर, जि. पुणे : ‘एकाही पानावर स्पॉट नाही...
विजेअभावी पिकांना पाणी देण्यास अडचणी नाशिक : अतिवृष्टीमुळे शेतमालाचे नुकसान झाले,...
जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवडीचा खडसेंचा...जळगाव ः जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
केळी पिकासाठी ३६ हजार रुपये परतावा द्या...जळगाव : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा...
बार्शी बाजार समिती सौरऊर्जेवरसोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत ९६...
द्राक्षबागेतील सद्यपरिस्थितीतील रोगांचा...बहुतांश द्राक्ष बागांमध्ये सध्या फळछाटणी पूर्ण...
धनत्रयोदशीला जळगावात ३० किलो सोने विक्रीजळगाव : जळगावची केळी व अस्सल सोन्यासाठी सुवर्ण...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष पट्ट्याला...सांगली : श्रीलंका, तमिळनाडू किनाऱ्यालगतच्या...
नांदेड जिल्ह्यात आचारसंहितेने...नांदेड : जिल्ह्यातील साडेआठ लाख नुकसानग्रस्तांना...
अकोला जिल्ह्याची पैसेवारी ५३ पैसेअकोला : जिल्ह्यात या वर्षी झालेला अनेकदा...
सांगली जिल्हा बँक जागावाटपात महविकास...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या निवडणुकीसाठी...
रत्नागिरी तालुक्यात भाताच्या लोंबीत...रत्नागिरी : फुलोऱ्या‍च्यावेळी पडलेल्या मुसळधार...
देगलूर-बिलोलीची निवडणूक ‘महाविकास’च्या...नांदेड : देगलूर - बिलोली विधानसभा निवडणुकीत...
ऊसबिलातून वीजबिल कपातीच्या आदेशाची...नगर : शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून साखर कारखान्यांनी...