Agriculture news in Marathi, The committee for the inquiry Nagar ZP CEO | Agrowon

नगरमधील सीईओंवरील ‘अविश्‍वासा’च्या चौकशीसाठी समिती

टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जुलै 2019

नगर ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्याविरुद्ध जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्या ठरावाची चौकशी सुरू झाली असून, राज्य सरकारच्या सूचनेनुसार नाशिक विभागीय आयुक्तांनी त्यासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबतचा अहवाल ग्रामविकास विभागास सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई निश्‍चित केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ विश्‍वजित माने यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी आठ जुलैला विशेष सभा घेण्यात आली होती. 

नगर ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांच्याविरुद्ध जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्या ठरावाची चौकशी सुरू झाली असून, राज्य सरकारच्या सूचनेनुसार नाशिक विभागीय आयुक्तांनी त्यासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबतचा अहवाल ग्रामविकास विभागास सादर केला जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई निश्‍चित केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ विश्‍वजित माने यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी आठ जुलैला विशेष सभा घेण्यात आली होती. 

या सभेत ६५ विरुद्ध शून्य, अशा बहुमताने माने यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यानंतर हा ठराव विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यात आला. कार्यालयाने तो ठराव राज्य सरकारकडे पाठविला. त्यावर ग्रामविकास विभागाने याबाबत काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार या ठरावाबाबत अभिप्राय सादर करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या अविश्वास ठरावाची चौकशी होणार आहे. विभागीय आयुक्तांनी तीन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. यामध्ये आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त, सहायक संचालक आणि शाखा अभियंता या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच, ठरावाबाबत सविस्तर माहिती घेण्यात येणार आहे. नगर जिल्हा परिषदेने ठरावाच्या अनुषंगाने आवश्‍यक माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही आयुक्त कार्यालयाने केली आहे. 

कार्यवाहीस विलंब 
जिल्हा परिषदेने अविश्वास ठराव मंजूर केला असला, तरी सरकारी पातळीवर अद्याप तो मंजूर नाही. सरकारने याबाबत आणखी माहिती मागविली आहे. या ठरावात अन्य काही मुद्दे आहेत. त्यामुळे या मुद्द्यांबाबतही चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी अधिकारी जिल्हा परिषदेत येणार आहेत. चौकशी झाल्यानंतर पुन्हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला जाईल. त्यानंतर आयुक्तांच्या अभिप्रायासह हा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून यावर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे कार्यवाही पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागणार आहे.


इतर बातम्या
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत केंद्रांवरील...औरंगाबाद : बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने तुरीची...
ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह...नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान...
रत्नागिरी दूध संघाकडून १ कोटी २० लाख...रत्नागिरी : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील चाळीस...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...
सांगली, कोल्हापूरसाठी विशेष पॅकेज : डॉ...सांगली : ‘‘महापूराने सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे...
वीज दरवाढीबाबत चार फेब्रुवारीला हरकती...मसूर, जि. सातारा ः महावितरणचा २०.४ टक्के वीज...
उत्पादकतेबरोबर विक्री कौशल्यही आवश्‍यक...सोलापूर : "उत्पादकतेबाबत शेतकरी बऱ्यापैकी सजग...
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही...मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या...
कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न...अकोला  ः नवी दिल्ली येथील अखिल भारतीय कृषी...
अकोले तालुका गैरव्यवहार प्रकरणी तीन...नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व...
मोहोळ येथे शेतकऱ्यांनी बॅंक...मोहोळ, जि. सोलापूर : अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍...
राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी...मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
बॅंकांनी रोखली गटशेतीची वाट :...नागपूर  ः गटशेती योजनेचे अनुदान ६०...
हवामान बदल सहनशील वाण संशोधनाला मिळणार...परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन...
ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयदिनी...मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत...