agriculture news in marathi Commodity mortgage loan scheme in Lasalgaon market committee | Agrowon

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना

टीम अॅग्रोवन
रविवार, 14 नोव्हेंबर 2021

नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन करिता लासलगाव बाजार समितीने शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम चालू झाले असून, हा शेतीमाल एकाचवेळी बाजार आवारात विक्रीस आल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून लासलगाव बाजार समितीने सन २०२१-२२ या हंगामाकरिता शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे या संस्थेमार्फत सन १९९०-९१ पासून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत बाजार समिती सन २०२१-२२ या हंगामाकरिता मका, सोयाबीन, चणा व गहू या प्रमुख शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच माल तारणात ठेवला जाणार आहे. शासकीय प्रतवारीकार व बाजार समितीचे प्रतवारीकार यांनी संयुक्तरीत्या शिफारस केलेला मका, सोयाबीन, चणा व गहू हा शेतीमाल ज्या दिवशी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणून ठेवला जाईल.

त्या दिवसाचे बाजारभाव विचारात घेऊन बाजार समिती वखार महामंडळाचे पावतीप्रमाणे स्वनिधीतून संबंधित शेतकऱ्यास धनादेशाद्वारे रक्कम अदा करणार आहे. संबंधित शेतकऱ्यांचा खाते उतारा व सातबारा उताऱ्यावरील मका, सोयाबीन, चणा व गव्हाचे लागवड क्षेत्र व उत्पादित माल याचे प्रमाण ठरवून किमतीच्या ७५ टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून ६ महिन्यांचे मुदतीने ६ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या ६ महिन्यांकरिता ८ टक्के व त्यापुढील ६ महिन्यांकरिता १२ टक्के व्याजदराने आकारणी केली जाणार आहे. १८ महिन्यांनंतर या कर्जास मुदतवाढ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

तरी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केले आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी ९९२१४२३५३६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.  


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...
गरज असलेल्या भागाला प्राधान्याने पाणी ः...नाशिक : मोठ्या प्रकल्पांमधील २०२१-२२ करिता...
पंचनामे झाले, नुकसान भरपाई कधी मिळणार?सांगली ः जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या...
औरंगाबादमध्ये टोमॅटो १६०० रुपये क्विंटलऔरंगाबाद ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...