पाच बाजार समित्यांची शेतमाल तारण योजना सुरू

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतमाल तारण योजना आहे. बाजार समित्यांना योजनेसाठी पाच लाख अग्रीम देण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे शेतकरी व बाजार समित्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. - जी. सी. वाघ, उपसरव्यवस्थापक,राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, औरंगाबाद
Commodity mortgage scheme of five market committees started
Commodity mortgage scheme of five market committees started

औरंगाबाद : येथील राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयांतर्गत येत असलेल्या ३६ पैकी पाच बाजार समित्यांनी शेतमाल तारण योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. २९ नोव्हेंबर २०१९ अखेर पाचही बाजार समित्यांतर्गत ८४ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल तारण योजनेंतर्गत तारण ठेवून त्या बदल्यात आपला शेतमाल अपेक्षित दर मिळेल, या आशेने न विकता राखून ठेवला आहे. 

शेतकऱ्यांना हमी अथवा अपेक्षित दरापेक्षा कमी दराने आपला शेतमाल विकण्याची वेळ येऊ नये. प्रसंगी गरज भागविण्यासाठी शेतमाल अत्यल्प व्याजदराने तारण ठेवून त्यांना हवी असलेली रक्‍कम मिळावी, त्यांची गरज भागली जावी, यासाठी राज्य शासनाच्या कृषी पणन मंडळाने शेतमाल तारण कर्ज योजना आणली. त्याला अनुसरून औरंगाबाद येथील राज्य कृषी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत परिणामकारकरीत्या राबविण्यासाठी कृषी पणन मंडळातर्फे जागृती केली गेली. त्याचा परिणाम म्हणून २०१८-१९ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, जवळा बाजार, वसमत, परभणी जिल्ह्यातील सेलू, परभणी, पाथरी, मानवत, जिंतूर तसेच जालना जिल्ह्यातील परतूर, जालना, मंठा, घनसावंगी, अंबड मिळून जवळपास १४ बाजार समित्यांनी ही योजना राबविली. 

या चारही जिल्ह्यांतील ५८५ शेतकऱ्यांनी २५९३४ क्‍विंटल मका, हळद, सोयाबीन, तूर, चना, गहू, मुग, उडीद आदी शेतमाल शेतकऱ्यांनी तारण योजनेंतर्गत तारण ठेवला होता. जवळपास ६ कोटी ३१ लाख १३ हजार ४ रुपये बाजार समितीने अदा केले. पणन मंडळाने त्यापैकी ३ कोटी ७० लाख ४७ हजार ३२४ रुपयांची प्रतिपूर्ती केली होती. काही बाजार समित्यांनी स्वनिधीतून ही योजना राबविली होती. साधारणपणे १ ऑक्‍टोबर ते ३० सप्टेंबरदरम्यान राबविल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील परतूर, जिंतूर, परभणी, पाथरी, मानवत या पाच बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यास सुरुवात केली.

८४ शेतकऱ्यांचा शेतमाल तारण

२९ नोव्हेंबरअखेरपर्यंत जवळपास ८४ शेतकऱ्यांनी सोयाबीन, हळद आदी ३८९२ क्‍विंटल ७२ किलो शेतमाल तारण ठेवला. १२ कोटी ४७ लाख ५ हजार ४७०रुपयांच्या या शेतमालासाठी बाजार समितीने ९१ लाख ४७ हजार १७ रुपये ६ टक्‍के कर्ज रूपात अदा केले. त्यापैकी ३० लाख ८३ हजार ९४४ रुपयांची प्रतिपूर्ती केल्याची माहिती पणन मंडळाने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com