गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढले

पुणे बाजारसमितीत कारल्याची झालेली आवक
पुणे बाजारसमितीत कारल्याची झालेली आवक

पुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात झाली आहे. परिणामी बाजारातील भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होऊ लागली असून, गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २१) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे ५० ट्रकने वाढ झाली होती. तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दोन लाख तर मेथीची दीड लाख जुड्या आवक झाली होती. दरम्यान टोमॅटोची आवकेबरोबर मागणी वाढल्याने दर वाढले होते.  

विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १२ टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेशातून २ ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ५ टेम्पो, इंदौर येथून गाजर सुमारे १० टेम्पो, कर्नाटकमधून घेवडा आणि पावटा प्रत्येकी सुमारे २ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ४०० गोणी, टॉमेटो सुमारे ६ हजार क्रेट, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, भेंडी सुमारे १२ तर गवार सुमारे ६ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे १५० गोणी, तसेच कांदा सुमारे ७५ ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव   कांदा - ११०-१४०, बटाटा- ८०-१४०, लसूण - ४००-८००, आले : सातारी ५००-७५०, भेंडी : १५०-२५०, गवार : २००-३००, टोमॅटो - २८०-३२०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : ६०-१००, चवळी : १५०-१६०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २५०-३५०, पांढरी २००-२५०, पापडी : २२०- २४०, पडवळ : २५०-२६०, फ्लॉवर : १५०-१८०, कोबी : २००-२५०, वांगी : १५० -२००, डिंगरी : १६० -१८०, नवलकोल : १५० -१६०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ४००- ४५०, गाजर : २००-२२० वालवर : २५०-३००, बीट : २००-२२०, घेवडा : ५००-६००, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३२०, घोसावळे : १६० -१८०, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ४०० -५००, पावटा : ४००-५००, मटार : परराज्य- १०००- १२००, तांबडा भोपळा ८०-१२०, चिंच अखंड ३५०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

फळबाजार रविवारी (ता. २१) मोसंबी सुमारे ४० टन, संत्री ४ टन, डाळिंब १५० टन, पपई ७ टेम्पो, लिंबे सुमारे २ हजार गोणी, चिक्कू ५०० डाग, कलिंगड ४ टेम्पो, खरबुज ३ टेम्पो, पेरुची सुमारे १०० क्रेट आवक झाली होती. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-८००, मोसंबी : (३ डझन) : १६०-३५०, (४ डझन) : ६०-१५०, संत्रा : (३ डझन) : १६०-४००, (डझन ४) : ८०-१८०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २०-११० गणेश १०-४०, आरक्ता १०-५०. कलिंगड : १२-१६, खरबूज : १५-२८, पपई : १२-२५, चिक्कू : १००-६००, पेरु (२० किलो) ५००-६००. 

पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दोन लाख तर मेथीची सुमारे सुमारे दीड लाख जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १०० -२५००, मेथी : ५००-१०००, शेपू : ७००-१०००, कांदापात : ८०० -१०००, चाकवत : ७०० -८००, करडई : ७०० -८००, पुदिना : ५०० -६००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ७०० -८००, चुका : ८००-१०००, चवळई : ८०० -१०००, पालक : ७०० -८००. 

फूलबाजार फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ६०-१००, बिजली - १२०-१८०, कापरी : ३०-६०, मोगरा : २००-३००, शेवंती - ८०-१२०, आॅस्टर : २०-३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२५, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ३०-८०, लिलि बंडल : ६-१० जर्बेरा : १०-४०, कार्नेशियन : ५०-१५०. 

मटण-मासळी  गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता. २१) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ७ टन, खाडीची सुमारे २५० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे दीड टन आवक झाली होती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक असल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान पावसामुळे पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक बंद असून, पूर्व किनारपट्टीवरून मासळीची आवक कमी आहे. तर मागणी जास्त असल्याने मासळीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५ ते १० टक्के वाढ झाली आहे. १५ ऑगस्ट नंतर पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक सुरू होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

खोल समुद्रातील मासळी  (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १५००-मोठे १५००-१६०० मध्यम: १०००- ११००, लहान ९००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ८००-८५०, सुरमई : ७५०-८००, रावस : लहान ७५०-८००, मोठा : १०००, घोळ : ७००-८००,  भिंग : ०००, करली ०००-००० करंदी-००, पाला : लहान ७००, मोठा ११००-१२००, वाम : पिवळी लहान ४८० मोठी ८००-९००,  काळी : ४८०, ओले बोंबील:२८०-३२०, कोळंबी ः लहान ३२०, मोठी :  ५५० जंबोप्रॉन्स : १४००-१५००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान : २००, मोठी- ४००-४८०, मांदेली : १६०, राणीमासा : २४०, खेकडे : २८०, चिंबोऱ्या : ६००.

खाडीची मासळी  नगली : लहान : ४८० मोठी ८००, तांबोशी : ५५०, लेपा : लहान २००, मोठे ३६०, शेवटे : २४०. बांगडा :  २४०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०, तिसर्या : २४०, खुबे १६०, तारली : १२०.

नदीची मासळी   रहू : १६०, कतला : १६०, मरळ : लहान ३२०, मोठे- ४८०, शिवडा : २००, चिलापी : ८०,  खवली : २४०, आम्ळी: १२० खेकडे : २४०, वाम : ४८०.

मटण   बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा: ५००, कलेजी : ५८०.

चिकन   चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 

अंडी  गावरान : शेकडा : ६१०, डझन : ८४ प्रति नग : ७ इंग्लिश : शेकडा : ३९० डझन: ६० प्रतिनग : ५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com