पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह पालेभाज्यांच्या दरात वाढ

पुणे बाजारसमितीत झालेली काकडीची आवक
पुणे बाजारसमितीत झालेली काकडीची आवक

पुणे   ः राज्यातील पूरस्थिती निवळल्यानंतर बाजारातील भाजीपाल्याची आवक सुरळीत झाली आहे. मात्र पुरामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने श्रावणातील भाजीपाल्याची सरासरीपेक्षा आवक कमीच आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची ७५ हजार जुड्या आवक झाली होती. मागणी वाढल्याने कांदा, वांगी, तोंडली आणि गाजरासह पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली होती. 

भाजीपाल्याच्या आवकेत परराज्यांतून आंध्रप्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरचीची, कर्नाटक आणि गुजरात येथून १० ट्रक कोबीची, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ५ टेम्पो, इंदौर येथून गाजराची सुमारे ६ टेम्पो, बंगळूर येथून आल्याची सुमारे २ टेम्पो, कर्नाटकमधून घेवड्याची सुमारे २ टेम्पो तर मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ६ हजार गोणी आणि आग्रा आणि इंदौर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली  होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे १ हजार गोणी, टॉमेटोची सुमारे ६ हजार क्रेट, फ्लॉवर आणि कोबीची प्रत्येकी सुमारे ८ टेम्पो, भेंडीची ८ टेम्पो, गवारची ५ टेम्पो, कोबी, सिमला मिरची आणि तांबडा भोपळ्याची प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, घेवड्याची ३ टेम्पो, मटारची १० टेम्पो, पावट्याची ४ टेम्पो, भुईमूग शेंगांची सुमारे १०० गोणी, तसेच कांद्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) : कांदा - १८०-२२०, बटाटा - १००-१४०, लसूण - ५००-१०००, आले : सातारी ५००-७००, बंगलोर -६००-७००, भेंडी : ३००-३५०, गवार : ५००-७००, टोमॅटो - १००-२२०, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : १००-१४०, कारली : हिरवी ३००-३२०, पांढरी २४०-२५०, पापडी : ४००- ४५०, पडवळ : २८०-३००, फ्लॉवर : २००-२५०, कोबी : १०० - १४०, वांगी : ४०० -५००, डिंगरी : २०० -२५०, नवलकोल : १०० -१२०, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी ४००-५००, जाड : २००-२५०, शेवगा : ५००, गाजर : ३५०-४०० वालवर : ३००-३५०, बीट : १८०-२००, घेवडा : ८००-१०००, कोहळा : १०० -१५०, आर्वी : ३००- ३५०, घोसाळे : १८० -२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ५०० -५५०, पावटा : ६००-६५०, मटार : परराज्य- ३००- ५००, तांबडा भोपळा १००-१४०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.    पालेभाज्यांचे दर (शेकडा, जुडी) : कोथिंबीर : ८०० -१४००, मेथी : ५००-१३००, शेपू : ६००-१०००, कांदापात : १५०० -२०००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ७०० -८००, पुदिना : १००० -१५००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १२००-१५००, राजगिरा : ७०० -८००, चुका : ८००-१०००, चवळई : ७०० -१०००, पालक : १५०० -१८००.    फळबाजार रविवारी (ता. १८) मोसंबीची सुमारे ६० टन, संत्रीची ५ टन, डाळिंबाची २०० टन, पपईची २० टेम्पो, लिंबाची सुमारे दिड ते २ हजार गोणी, चिक्कूची १ हजार डाग, कलिंगडाची ५ टेम्पो, खरबूजाची ४ टेम्पो, पेरूची सुमारे २०० क्रेट आवक झाली होती. 

फळांचे भाव : लिंबे (प्रति गोणी) : १००-७००, मोसंबी : (३ डझन) : १६०-३५०, (४ डझन ) : ५०-१४०, संत्रा : (३ डझन) : १६०-३५०, (डझन ४) : ५०-१४०, डाळींब (प्रति किलो) : भगवा : ३०-१३० गणेश १५-३५, आरक्ता २५-७५. कलिंगड : १०-२० खरबुज : १०-३५, पपई : १०-३०, चिक्कू : १००-५००, पेरु (२० किलो) ७००-८००, सफरचंद सिमला (२५ किलो) - १४००-२८००.    फूलबाजार फुलांचे दर (प्रति किलो) : झेंडू : २०-४०, गुलछडी : १५०-३००, बिजली - २०-१८०, कापरी : ३०-६०, शेवंती - १००-१२०, ॲस्टर : १५-२५, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : ५-१०, गुलछडी काडी : २०-४०, डच गुलाब (२० नग) : ४०-६०, लिली बंडल : १५-२० जर्बेरा : २०-३०, कार्नेशियन : ४०-८०.    मटण-मासळी गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता. १८) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ६ टन, खाडीची १०० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे ४०० किलो आवक झाली होती. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ६ टन आवक झाल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली.

श्रावण महिन्यामुळे मासळी, चिकन, मटनाला मागणी कमी आहे. पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक सुरू झाली आहे. मागणी कमी आणि आवक वाढल्याने सर्व प्रकारच्या मासळीच्या दरात १० ते २० टक्के घट झाली आहे. खाडीच्या मासळीची आवक बंद झाली आहे. यामुळे बाजारात सौंदाळे, खापी, नगली, पालू, लेपा, शेवटे उपलब्ध नाही. चिकन, अंडी आणि मटणाचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.   

खोल समुद्रातील मासळी (दर प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १५००-मोठे १३०० मध्यम:८००, लहान ६००, भिला : ४००-४८०, हलवा : ६००, सुरमई : ४००-६००, करंदी २००, पाला : लहान ६००-८००, मोठा १०००, वाम : पिवळी लहान ४००-४८० मोठी ६००-७००,  काळी :३६०, ओले बोंबील: १००-१६०, कोळंबी ः लहान २८०, मोठी :  ४०० जंबोप्रॉन्स : १३००, किंगप्रॉन्स : ९००, लॉबस्टर : १३००, मोरी : लहान : २००, मांदेली : १२०-१४०, खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ५००-५५०.  

खाडीची मासळी :  नगली : लहान : ३६०, तांबोशी : मोठी - ४८०, लेपा : लहान १४०, बांगडा :  लहान  १४०-१६० मोठे २००, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : १६०, खुबे १००-१२०, तारली : १००-१२०.

नदीची मासळी : रहू :१४०, कतला : १४०, मरळ : लहान २८०, मोठे  ४४०, शिवडा : १६०, चिलापी : ६०,  खवली : १८०, आम्ळी: ८० खेकडे : २००, वाम : ४८०.

मटण : बोकड : ५००, बोल्हाई : ५००, खिमा: ५००, कलेजी : ५८०. चिकन : चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०.  अंडी : गावरान : शेकडा : ५८०, डझन : ८४ प्रति नग : ७ इंग्लिश : शेकडा : ३५४ डझन: ४८ प्रतिनग : ४.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com