agriculture news in Marathi, commodity rates in market committe, pune, maharashtra | Agrowon

पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर होती. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख, तर मेथीची ४० हजार जुड्या आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने गेल्या आठवड्यातील बहुतांश भाजीपाल्याचे वाढलेले दर स्थिर होते.  

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २५) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर होती. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे अडीच लाख, तर मेथीची ४० हजार जुड्या आवक झाली होती. आवक आणि मागणी स्थिर असल्याने गेल्या आठवड्यातील बहुतांश भाजीपाल्याचे वाढलेले दर स्थिर होते.  

भाजीपाला आवकेत परराज्यांतील आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरचीची, कर्नाटक आणि गुजरात येथून ८ टेम्पो कोबीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ४ टेम्पो, इंदूर येथून गाजराची सुमारे ६ टेम्पो, कर्नाटकमधून घेवडयाची सुमारे ४ टेम्पो, तर मध्य प्रदेश आणि गुजरातमधून  लसणाची सुमारे ६ हजार गोणी, तर आग्रा आणि इंदूर येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेत सातारी आल्याची सुमारे १५०० गोणी, टोमॅटोची सुमारे ६ हजार क्रेट, फ्लॉवरची १०, तर कोबीची सुमारे ८ टेम्पो, भेंडीची १० टेम्पो, गवारीची ८ टेम्पो, कोबीची ८ टेम्पो, फ्लॉवरची १० टेम्पो, सिमला मिरची आणि तांबडा भोपळयाची प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, मटारची ५ टेम्पो, पावटाची ४ टेम्पो, भुईमूग शेंगांची सुमारे १०० गोणी, तसेच कांद्याची सुमारे १०० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दर (प्रतिदहा किलो) : 
कांदा -२००-२५०, बटाटा- ८०-१४०, लसूण - ५००-९००, आले : सातारी ६००-६५०, भेंडी : २५०-३००, गवार : २५०-४००, टोमॅटो - १००-१५०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-२५०, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी २००-२५०, पांढरी १८०-२००, पापडी : ३००- ४००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १२०-२००, कोबी : १२० - १६०, वांगी : ४०० -४५०, डिंगरी : २०० -२२०, नवलकोल : १४० -१५०, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २५०-३००, जाड : १००-१२०, शेवगा : ४००-४५०, गाजर : ३५०-४०० वालवर : ३००-३५०, बीट : २००-२४०, घेवडा : ४००-५००, कोहळा : १०० -१५०, आर्वी : २५०- ३००, घोसाळे : १५० -२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग : ५०० -५५०, पावटा : ५५०-६००, मटार : ५००- ७००, तांबडा भोपळा १००-१५०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्यांचे दर (शेकडा, जुडी) : 
कोथिंबीर : ३००-७००, मेथी : ८००-१५००, शेपू : ८००-१०००, कांदापात : १२०० -१५००, चाकवत : ६०० -८००, करडई : ६०० -८००, पुदिना : १००० -१२००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ८०० -१०००, चुका : ७००-८००, चवळई : ५०० -८००, पालक : ८०० -१०००. 

फळबाजार 
रविवारी (ता. २५) मोसंबीची सुमारे ७० टन, संत्रीची ४ टन, डाळिंबाची ३०० टन, पपईची २० टेम्पो, लिंबाची सुमारे दीड ते २ हजार गोणी, चिकूची १ हजार डाग, कलिंगडाची ५ टेम्पो, खरबुजाची ४ टेम्पो, पेरूची सुमारे ४०० क्रेट, तर सीताफळाची सुमारे ८ टन आवक झाली होती.

फळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : १५०-८००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ६०-१५०, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (डझन ४) : ६०-१५०, डाळिंब (प्रति किलो) : भगवा : ३०-१३० गणेश १०-३०, आरक्ता २०-५०. कलिंगड : १०-२० खरबूज : १०-३५, पपई : १०-३०, चिकू : १००-५००, पेरू (२० किलो) ७००-९००, सफरचंद सिमला (२५ किलो) - १७००-३०००. 
 
फुलबाजार
फुलांचे दर (प्रतिकिलो) : झेंडू : २०-५०, गुलछडी : १२०-२००, बिजली : १२०-१६०, कापरी : ३०-६०, शेवंती : ८०-१५०, अ‍ॅस्टर : १६-२५, गलांड्या : १५-२० (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-५०, डच गलाब (२० नग) : ५०-१००, लिली बंडल : १५-२०,  जरबेरा : २०-४०, कार्नेशियन : ८०-१५०.
 
मटण-मासळी 
नारळी पौर्णिमेनंतर पूर्व व पश्‍चिम किनारपट्टीवरून बाजारात मासळीची आवक सुरू झाली असली, तरी अद्याप श्रावण महिना सुरू असल्याने मासळीसह मटण, चिकनला मागणी कमी आहे. त्यामुळे आवक वाढूनही मागणी कमीच असल्याने सर्वच मासळीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. इंग्लिश अंड्याच्या दरात शेकडा १० ते १५ रुपयांनी घट झाली असून, मटण आणि चिकनचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.   

दरम्यान, गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता. २५) खोलसमुद्रातील मासळीची सुमारे ८ टन, खाडीची सुमारे २०० किलो, तर नदीच्या मासळीची १ टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० टन आवक झाल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळीचे दर (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १३००-१४०० मोठे १३००-१४०० मध्यम : ८००, लहान ६००, भिला : ५००-५५०, हलवा : ४८०-५५०, सुरमई : ४४०-५२०, रावस : लहान ४८०, मोठा : ६००, घोळ : ६००,  भिंग : ३२०, करली २४०, करंदी  सोललेली २८०, पाला : लहान ५५०, मोठा ९००-१३००, वाम : पिवळी लहान २४० मोठी ४८०,  काळी : २४०, ओले बोंबील : ६०-१००, कोळंबी ः लहान २४०, मोठी :  ४०० जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ७००, लॉबस्टर : १२००, मोरी : लहान : १६०, मोठी २४०, मांदेली : १००, राणीमासा : १६०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०.

खाडीची मासळी : सौंदाळे : २४०, खापी २००, नगली : लहान : ३२० मोठी ४८०, तांबोशी : मोठी-४८०, पालू : २००, लेपा : लहान १००, मोठे २००, शेवटे : २०० बांगडा : लहान १६० मोठे  २००, पेडवी : ६०, बेळुंजी : १००, तिसऱ्या : १६०, खुबे १२०, तारली : -१२०

नदीची मासळी : रहू : १४०, कतला : १६०, मरळ : लहान २४०, मोठे  ४००, शिवडा : १६०, चिलापी : ६०-८० खवली : १६०, आम्ळी : १०० खेकडे : २४०, वाम : ४८०
मटण : बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा : ५००, कलेजी : ५८०.
चिकन : चिकन : १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०. 
अंडी : गावरान : शेकडा : ५९०, डझन : ८४, प्रति नग : ७. इंग्लिश : शेकडा : ३४० डझन : ४८ प्रतिनग : ४.
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
नांदेडमध्ये हळद ४९०० ते ५७०० रूपये...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...