अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये क्विंटल

अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये क्विंटल
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये क्विंटल

अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १७) सोयाबीनची आवक १३४२ क्विंटल झाली होती. सोयाबीन कमीत कमी ३००० व जास्तीत जास्त ३६२५, तर सरासरी ३६१० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. या आठवड्यात बाजारात सोयाबीनच्या आवकेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

येथील बाजार समितीत हरभऱ्याला ३६०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी ४२५० रुपयांचा दर होता. तुरीला सरासरी ५६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ५९३ क्विंटल आवक झाली होती. कमीत कमी भाव ४२०० व जास्तीत जास्त ५८०० रुपये दर होता.

ज्वारीची आवक १३ क्विंटल आवक झाली होती. ज्वारीला प्रतिक्विंटल २२०० ते २३५०, तर सरासरी २२७५ रुपये असा दर होता. गव्हाची आवक ४० क्विंटल झाली होती. गव्हाला प्रतिक्विंटल १७५० ते २०००, तर सरासरी १९२५ रुपये असा दर मिळाला. गहू (शरबती) कमीत कमी २२५० व जास्तीत जास्त २३०० रुपये दराने विक्री झाला. सरासरी २२७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. १९ क्विंटल गव्हाची आवक झाली होती. 

उडीद कमीत कमी ३८०० व जास्तीत जास्त ४६०० रुपये प्रतिक्विंटल अशा दराने विक्री झाला. मूग कमीत कमी ५००० व जास्तीत जास्त ५८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. सरासरी ५७२५ रुपये दर होता. १४ क्विंटल आवक होती.

मालाचा प्रकार सरासरी दर
ज्वारी २२७५
गहू १९२५
गहू (शरबती) २२७५
उडीद ४४००
मूग ५७२५
तूर ५६००
हरभरा ४२५०
सोयाबीन ३६१०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com