agriculture news in marathi, commodity rates in market committee, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव येथे हिरवी मिरची १५०० ते ४००० रुपये क्विंटल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीला मंगळवारी (ता. २७) १५०० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली.
जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीला मंगळवारी (ता. २७) १५०० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीची आवक बऱ्या प्रमाणात असली, तरी मागणी अधिक असल्याने दरवाढ झाल्याचे बाजार समितीमधील सूत्रांनी सांगितले. 
 
मिरचीची आवक जिल्ह्यातील जामनेर तालुक्‍यातील पहूर, शेंदूर्णी व परिसरातील गावांमधून होते. बाजारात वाटाण्याची १८ क्विंटल आवक झाली. वाटाण्याला १००० ते १८०० रुपये, तर सरासरी १४०० रुपये क्विंटल दर होता. शेवगा शेंगांची सहा क्विंटल आवक झाली. त्यांना २००० ते ३२०० रुपये तर सरासरी २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. लिंबूची नऊ क्विंटल आवक झाली. लिंबाला १००० ते २००० रुपये तर सरासरी १५०० रुपये क्विंटल असा दर होता. मुळ्याची सहा क्विंटल आवक झाली. मुळ्यास १००० ते १२०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल दर होता.
 
आल्याची (अद्रक) १५ क्विंटल आवक झाली. त्यास १५०० ते २००० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल दर होता. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. बटाटयाला ६०० ते ११०० रुपये, तर सरासरी ८०० रुपये क्विंटल दर होता. भेंडीची १८ क्विंटल आवक झाली. भेंडीला १२०० ते २२०० रुपये, तर सरासरी १५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कोबीची १५ क्विंटल आवक झाली. कोबीला ३०० ते ६०० रुपये, तर सरासरी ५०० रुपये क्विंटल दर होता.
 
बाजार समितीत लाल कांद्याची ४३० क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला ७५० ते १५५० रुपये, तर सरासरी १२०० रुपये क्विंटल असा दर होता. कोथींबिरीची १२ क्विंटल आवक झाली. कोथिंबीरीला ४०० ते १००० रुपये, तर सरासरी ६०० रुपये क्विंटल दर मिळाला. मेथीची सहा क्विंटल आवक झाली. मेथीला ५०० ते १००० रुपये, तर सरासरी ७०० रुपये क्विंटल असा दर होता.
 
पालकची दोन क्विंटल आवक झाली. पालकास १४०० रुपये क्विंटल दर होता. टोमॅटोची २५ क्विंटल आवक झाली. टोमॅटोस ४०० ते ७५० रुपये, तर सरासरी ५०० रुपये क्विंटल असा दर होता. वांग्यांची ३५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३०० ते ५०० तर सरासरी ४०० रुपये दर होता.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...