परभणीत लिंबू प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये

लिंबू बाजार
लिंबू बाजार
परभणी : येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १८) लिंबाची १५ क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये दर मिळाला, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
 
पालेभाज्यांमध्ये पालकाची २० क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक झाली. चुक्याला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. शेपूची ६ क्विंटल आवक झाली. शेपूला प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. अंबाडी भाजीच्या २ हजार जुड्यांची आवक असताना प्रतिशेकडा २०० ते ४०० रुपये दर मिळाले. कोथिंबीर ४० क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले.
 
शेंगवर्गीय भाज्यांमध्ये गवारीची ४ क्विंटल आवक झाली. गवारीला प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाले. चवळीची ४ क्विंटल आवक झाली. चवळीला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. शेवग्याची ८ क्विंटल आवक झाली. शेवग्याला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कारल्याची ६ क्विंटल आवक झाली. कारल्याला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले.
 
दोडक्याची ६ क्विंटल आवक झाली. दोडक्याला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. काकडीची १५ क्विंटल आवक झाली. काकडीला प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक झाली. कोबीला प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. फ्लाॅवरची १५ क्विंटल आवक झाली. फ्लाॅवरला प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले. वांग्याची ४० क्विंटल आवक झाली. वांग्याला प्रतिक्विंटल ८०० ते १८०० रुपये दर मिळाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com