agriculture news in marathi, commodity rates in market committee, pune, maharashtra | Agrowon

पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 मे 2019

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) भाजीपाल्याची सुमारे १४० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर होती. मात्र सध्याची दुष्काळी स्थिती आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने आवक सरासरीपेक्षा मंदावली आहे. दरम्यान बहुतांश भाजीपाल्यासह पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते. 

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) भाजीपाल्याची सुमारे १४० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक स्थिर होती. मात्र सध्याची दुष्काळी स्थिती आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने आवक सरासरीपेक्षा मंदावली आहे. दरम्यान बहुतांश भाजीपाल्यासह पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते. 

भाजीपाल्याच्या आवकेत    परराज्यांतून आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे १० टेंपो हिरवी मिरचीची, हिमाचल प्रदेशातून सुमारे ७  ट्रक मटारची, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबीची, कर्नाटकमधून तोतापुरी कैरीची सुमारे ५ टेंपो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ४ टेंपो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आलेची सुमारे १ हजार गोणी, टॉमेटोची सुमारे ५ हजार क्रेट, कोबीची ८ तर फ्लॉवरची सुमारे १० टेंपो, ढोबळी मिरचीची १२ टेंपो, तांबडा भोपळ्याची ८ टेंपो, भेंडीची १०, गवारीची सुमारे ६ टेंपो, काकडीची १०, गावरान कैरीची सुमारे ४ टेंपो, चिंचेची ४० गोणी, उन्हाळी भुईमुगाची सुमारे ६० गोणी, तसेच कांद्याची सुमारे १०० ट्रक तर स्थानिकसह आग्रा, इंदूर येथून बटाट्याची सुमारे ३० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) ः 
कांदा - ६०-१००, बटाटा- १२०-१६०, लसूण - ३००-७००, आले : सातारी ६५०-७००, भेंडी : १५०-२००, गवार : २००-३००, टोमॅटो - ६०-८०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ३००-५००, दुधी भोपळा : ८०-१५०, चवळी : १५०-२००, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी ४००-४५०, पांढरी ३००-३५०, पापडी : २५० -३००, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ८०-१००, वांगी : १०० -२००, डिंगरी : १५० -२००, नवलकोल :१०० -१२०, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २००-२५०, गाजर : १००- १४०, वालवर : ३००-३५०, बीट : ६०-१००, घेवडा : ६००-६५०, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १५० -२००, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ३५० -४५०, पावटा : ५०० -५५०, मटार : ५००, तांबडा भोपळा ८०-१४०, चिंच अखंड ३०० -३५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
 

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची गुजरात आणि स्थानिक सुमारे दोन लाख तर मेथीची सुमारे अवघी सुमारे ३५ हजार जुड्या आवक झाली होती.
पालेभाज्यांचे दर (शेकडा, जुडी) : कोथिंबीर : १००० -१५००, गुजरात (गौरी) - ५००-८००, मेथी : ७००-१५००, शेपू : ८००-१०००, कांदापात : २००० -२५००, चाकवत : ५०० -८००, करडई : ५०० -६००, पुदिना : २०० -४००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ७०० -१५००, चुका : ८००-१०००, चवळई : ५०० -८००, पालक : ५०० -८००.

फळबाजार
रविवारी (ता. ५) मोसंबीची सुमारे ४० टन, संत्र्याची ६ टन, डाळिंबाची २०० टन, पपईची १० टेंपो, लिंबाची सुमारे ३ हजार गोणी, चिकूची दीड हजार डाग, कलिंगडाची ३० टेंपो, खरबुजाची २० टेंपो आवक झाली होती. कोकणातून कच्च्या हापूस आंब्याची सुमारे १० हजार पेटी आवक झाली होती. कर्नाटकातून विविध जातींच्या आंब्याची सुमारे २० हजार पेटी, करंडीची आवक झाली होती. लिंबाच्या आवकेमध्ये लहान आणि हिरव्या लिंबाचे प्रमाण जास्त होते.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-६००, मोसंबी : (३ डझन) : १६०-३५०, (४ डझन ) : ६०-१५०, संत्रा : (३ डझन) : २००-५५०, ( डझन ४) : ७०-२००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५-६०, गणेश ५-२०, आरक्ता ५-४०. कलिंगड : ५-१३, खरबूज : १०-२०, पपई : ५-१५, चिकू : १००-७००, आंबा (कर्नाटक) लालबाग २०-३०, हापूस (४-५ डझन) ५००-१०००, पायरी (४ डझन) ४००-८००, तोतापुरी - २०-३५, मल्लिका - ३५-४५, कोकण हापूस (४-८ डझन) तयार - १५००-३०००, (८ ते १० डझन) तयार २००० ते ३५००.
 
मटण मासळी
गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. ५) खोल समुद्रातील मासळी सुमारे ८ टन, खाडीची २०० किलो तर नदीच्या मासळीची २ टन आवक झाली होती. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाली होती. दरम्यान पूर्व किनारपट्टी वरून मासेमारी बंद झाली असून, पश्चिम किनारपट्टीवरील मासळीची आवक होत आहे. मात्र ही आवक तुलनेने कमी असल्याने मासळीच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी 
(दर प्रतिकिलो) :  पापलेट : कापरी : १६००, मोठे १६००, मध्यम : १४००, लहान ९००-१०००, भिला : ८००, हलवा : ७५०-८००, सुरमई : ९००, रावस : लहान ७००, मोठा : ८००, घोळ : ७००, करली : २००-४००, करंदी  (सोललेली) : ४००, भिंग : ४००, पाला : लहान ७००, मोठा १०००, वाम : पिवळी लहान ४८०, मोठे - ७००-८००,  काळी : ४००, ओले बोंबील : १४०-२४०, कोळंबी ः लहान २४०, मोठी : ४८० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान : २००, मोठी ४००, मांदेली : १४०, राणीमासा : २००, खेकडे : २४०, चिंबोऱ्या : ४८०-५५०.

खाडीची मासळी 
सौंदाळे : २८०, खापी ३२०, नगली : लहान : २०० मोठी ६००, तांबोशी : ४८०, पालू : २४०, लेपा : लहान १८०, शेवटे : २८० बांगडा : लहान १४०, मोठा १८०-२२०, पेडवी : १००, बेळुंजी : १००-१६०, तिसऱ्या : २४०, खुबे १२०- १४०, तारली : १२०-१६०.

नदीची मासळी 
रहू : १४०-१६०, कतला : १६०-२००, मरळ : लहान २८०-३२०, मोठे- ४८०, जिवंत मरळ : ७०० -८००, शिवडा : २४०, चिलापी : १००,  खवली : २००, आम्ळी: १००-१२० खेकडे : २८०, वाम : ५५०.

मटण 
बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.
 

चिकन : चिकन : १७०, लेगपीस : २००, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०. 
 

अंडी : गावरान : शेकडा : ६६०, डझन : ९०, प्रतिनग : ७.५, इंग्लिश : शेकडा : ४००, डझन : ५४ प्रतिनग : ४.५.
 

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...