agriculture news in marathi, commodity rates in market committee, pune, maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत श्रावण घेवडा, टोमॅटोच्या दरात वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 मे 2019

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत वाढ झाली होती. श्रावण घेवड्यासह टोमॅटोच्या दरात वाढ झाली होती. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. दरम्यान, बहुतांश भाजीपाल्यासह पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.

पुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) सुमारे १५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत वाढ झाली होती. श्रावण घेवड्यासह टोमॅटोच्या दरात वाढ झाली होती. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. दरम्यान, बहुतांश भाजीपाल्यासह पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.

विविध भाजीपाल्याच्या आवकेत परराज्यातून आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरव्या मिरचीची, हिमाचल प्रदेशातून सुमारे ७ ट्रक मटारची, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून ४ ट्रक कोबीची, कर्नाटकमधून तोतापुरी कैरीची सुमारे ८ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ४ टेम्पो, कर्नाटकमधून श्रावण घेवड्याची सुमारे २ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे १ हजार गोणी, टॉमेटोची सुमारे ४ हजार क्रेट, कोबी आणि फ्लॉवरची प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, ढोबळी मिरचीची १२ टेम्पो, तांबडा भोपळ्याची १० टेम्पो, भेंडीची १०, गवारीची सुमारे ८ टेम्पो, काकडीची १० , गावरान कैरीची सुमारे ८ टेम्पो, चिंचेची २५ गोणी, उन्हाळी भुईमुगाची सुमारे १०० गोणी, तसेच कांद्याची सुमारे ८० ट्रक तर स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) 
कांदा - ८०-१००, बटाटा- ९०-१५०, लसूण - ४००-८००, आले : सातारी ६५०-७००, भेंडी : १००-२००, गवार : २००-३००, टोमॅटो - १५०-१८०, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : ४५०-५००, दुधी भोपळा : ६०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : ५०-१००, कारली : हिरवी ३५०-४००, पांढरी २५०-३००, पापडी : ३०० -३२०, पडवळ : ३००-३५०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : ८०-१००, वांगी : १०० -२००, डिंगरी : १५० -२००, नवलकोल :१०० -१२०, ढोबळी मिरची : २५०-३५०, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ३००-३२०, गाजर : १४०- १६०, वालवर : ३००-३५०, बीट : १००-१२०, घेवडा : ८००-९००, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १५० -२००, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ३०० -३५०, पावटा : ५०० -५५०, मटार : ४८०-५००, तांबडा भोपळा ८०-१२०, चिंच अखंड ३०० -३५०, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दोन लाख तर मेथीची सुमारे अवघी सुमारे २५ हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे दर (शेकडा, जुडी) : कोथिंबीर : ५०० -१३००, मेथी : १०००-१६००, शेपू : १०००-१२००, कांदापात : १५०० -२२००, चाकवत : १००० -१२००, करडई : ५०० -८००, पुदिना : ३०० -५००, अंबाडी : ७००-१०००, मुळे : १२००-१५००, राजगिरा : ६०० -८००, चुका : १०००-१२००, चवळई : ८०० -१०००, पालक : ६०० -८००.

फळबाजार
बाजारात रविवारी (ता. १२) मोसंबीची सुमारे ५० टन, संत्रीची १० टन, डाळिंबाची २०० टन, पपईची ८ टेम्पो, लिंबांची सुमारे २ हजार गोणी, चिक्कूची ७०० डाग, कलिंगडाची १५ टेम्पो, खरबुजाची ६ टेम्पो आवक झाली होती. कोकणातून कच्च्या हापूस आंब्याची सुमारे ५ हजार पेटी आवक झाली होती. कोकणच्या तयार हापूसची मुबलक आवक होती. कर्नाटकातून विविध जातींच्या आंब्याची सुमारे २० हजार पेटी, करंडीची आवक झाली होती.

फळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : ३००-१०००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ५०-१५०, संत्रा : (३ डझन) : २००-४५०, (डझन ४) : ८०-२००, डाळींब (प्रति किलो) : भगवा : २०-८०, गणेश १०-२५, आरक्ता ५-३०. कलिंगड : १०-१८, खरबुज : १०-२२, पपई : १०-१५, चिक्कू : ३००-५००, आंबा (कर्नाटक) लालबाग २०-३०, हापूस (४-५ डझन) ५००-१०००, पायरी (४ डझन) ४००-८००. तोतापुरी - २०-२५, मल्लिका - ३०-३५, कोकण हापूस (४-८ डझन) तयार - १२००-२२००, (८ ते १० डझन) तयार १५०० ते २८००.

फुलबाजार
फुलांचे दर (प्रति किलो) :
झेंडू : १०-३६, गुलछडी : ३०-६०, बिजली : २०-६०, कापरी : १०-४०, मोगरा : २००-३००, ॲस्टर : १०-१६, (गड्डीचे भाव) गुलाब गड्डी : १०-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिली बंडल : ३-६, जर्बेरा : २०-४०, कार्नेशियन : १००-१५०.

मटण मासळी
गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १२) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ८ टन, खाडीची ३०० किलो तर नदीची सुमारे २ टन आवक झाली होती. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक असल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे १६००-१८००, मध्यम: १०००, लहान ७००-८००, भिला : ६००-७००, हलवा : ६५०-७००, सुरमई : ७००-८००, रावस : लहान ६५०-७५०, मोठा : ८००, घोळ : ७००, करली : ३६०-४००, करंदी  (सोललेली) : ४००, भिंग : ४००, पाला : लहान ७००, मोठा १०००-१२००, वाम : पिवळी लहान ४००-४८०, मोठे - ७५०-८००,  काळी :३२०- ४००, ओले बोंबील:१२०-२००, कोळंबी ः लहान २४०, मोठी : ४८० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान : २००-२४०, मोठी ३६०- ४००, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १८०-२००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०-५५०

खाडीची मासळी 
सौंदाळे : २४०, खापी २४०-२८०, नगली : लहान : ३६० मोठी ५५०-६००, तांबोशी : ४८०, पालू : २४०, लेपा : लहान १८० मोठे २४०, शेवटे : २८० बांगडा : लहान १४०, मोठा १८०-२००, पेडवी : १००, बेळुंजी : १४०-, तिसऱ्या : २४०, खुबे १२०- १४०, तारली : १४०-१६०.

नदीची मासळी 
रहू : १४०-१६०, कतला : १६०-१८०, मरळ : लहान २४० मोठे- ४८०, जिवंत मरळ : ८००, शिवडा : २००, चिलापी : ६०-८०,  खवली : २००, आम्ळी: १०० खेकडे : ३२०, वाम : ४४०.

मटण  
बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.

चिकन 
चिकन : १७०, लेगपीस : २००, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०. 

अंडी 
गावरान : शेकडा : ६६०, डझन : ९० प्रति नग : ७.५,  इंग्लिश : शेकडा : ३९५  डझन: ५४ प्रतिनग : ४.५. 
 

इतर बाजारभाव बातम्या
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोयाबीनच्या दरात अल्पशी तेजीनागपूर ः शेतकरी खरीप हंगामात गुंतल्याने तसेच नवा...
सोलापुरात हिरवी मिरची, ढोबळी मिरचीचे दर...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
गुलटेकडीत कोबी, शेवगा, गाजराच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...