agriculture news in marathi, commodity rates in market committee, pune, maharashtra | Agrowon

पुण्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरचीचे दर वाढले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 मे 2019

पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १९) भाजीपाल्याची सुमारे १४० ते १५० ट्रक आवक झाली होती. कांदा, आले, टोमॅटो, ढोबळी मिरचीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. रमजानमुळे फळांना मागणी वाढली होती. 

पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १९) भाजीपाल्याची सुमारे १४० ते १५० ट्रक आवक झाली होती. कांदा, आले, टोमॅटो, ढोबळी मिरचीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. रमजानमुळे फळांना मागणी वाढली होती. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे १० ते १२ टेंपो हिरवी मिरचीची, हिमाचल प्रदेशातून सुमारे ६ ट्रक मटारची, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ते ४ ट्रक कोबीची, कर्नाटकमधून तोतापुरी कैरीची सुमारे ५ ते ६ टेंपो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ३ ते ४ टेंपो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे ८०० ते १ हजार गोण्या, टॉमेटोची सुमारे ४ हजार ५०० क्रेट, कोबीची ८ ते १० टेंपो, फ्लॉवरची प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेंपो, ढोबळी मिरचीची ८ ते १० टेंपो, तांबडा भोपळ्याची १२ टेंपो, गावरान कैरीची सुमारे १० टेंपो, उन्हाळी भुईमुगाची सुमारे १५० गोण्या, तसेच कांद्याची सुमारे ८० ट्रक तर स्थानिक सह आग्रा, इंदूर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) ः कांदा : ९०-१२०, बटाटा : ८०-१६०, लसूण : ४००-८००, आले : सातारी ७५०-८००, भेंडी : १५०-२५०, गवार : २००-३००, टोमॅटो : १५०-२००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : ३००-५००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : १५०-२००, काकडी : ६०-१००, कारली : हिरवी ३००-४००, पांढरी २००-२५०, पापडी : ३००-४००, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ८०-१००, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ३५०-४००, गाजर : १२०- १५०, वालवर : ३००-३५०, बीट : १००-१२०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : १५०-२००, भुईमूग : ३०० -४००, पावटा : ५००-५५०, मटार : ४५०-५५०, तांबडा भोपळा : ८०-१२०, चिंच : अखंड : ३५०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
 

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे दीड लाख तर मेथीची सुमारे अवघी सुमारे २५ हजार जुड्या आवक झाली होती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा, जुडी) : कोथिंबीर : ८०० -१५००, मेथी : ७००-१४००, शेपू : १०००-१२००, कांदापात : १५०० -१८००, चाकवत : ७०० -८००, करडई : ५००-७००, पुदिना : ४००-५००, अंबाडी : ६००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५०० -६००, चुका : ८००-१०००, चवळई : ४०० -६००, पालक : ५०० -८००.
 

फुलबाजार
फुलांचे दर (प्रतिकिलो) : झेंडू : २०-५०, गुलछडी : ३०-५०, बिजली : ४०-५०, कापरी : ३०-८०, मोगरा : २००-३००, अ‍ॅस्टर : १४-२०, गलांड्या : ६-१२ (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिलीबंडल : ३-५, जरबेरा : २०-५०, कार्नेशियन : १००-१५०.

फळबाजार
रविवारी (ता. १९) मार्केट यार्डात मोसंबीची सुमारे ३० टन, संत्र्याची १० टन, डाळिंबाची १५० ते २०० टन, पपईची १५ ते २० टेम्पो, लिंबाची सुमारे ३ हजार गोणी, चिकूची दोन हजार डाग, कलिंगडाची ३५ ते ४० टेंपो, खरबुजाची २० ते २५ टेंपो आवक झाली होती. कोकणातून कच्च्या हापूस आंब्याची सुमारे ४ ते ५ हजार पेट्या आवक झाली होती. कर्नाटकातून विविध जातींच्या आंब्याची सुमारे १६ हजार पेट्या, करंडीची आवक झाली होती.

फळांचे भाव : लिंबू (प्रतिगोणी) : ४००-१०००, अननस (डझन) : ७०-३००, मोसंबी : (३ डझन) : १३०-३८०, (४ डझन) : ४०-१५०, संत्रा : (३ डझन) : २५०-५५०, (४ डझन ) : ११०-२५०, डाळिंब (प्रति किलो) : भगवा : १०-६०, गणेश, आरक्ता ५-२५. कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-२२, पपई : १५-२०, चिकू : १००-७००, पेरू : ४००-६००, आंबा : रत्नागिरी हापूस : कच्चा (४ ते ८ डझन) ६००-२०००, तयार (४ ते ८ डझन) : १२०० ते २२००, (कर्नाटक) : बदाम (१ किलो) ३०-४०, तोतापुरी २०- ३०, लालबाग २०-३०, हापूस (४ ते ५ डझन) ६००-१०००, पायरी (४ डझन) ४००-८००.

मटण मासळी
गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. १९) खोल समुद्रातील मासळी सुमारे ७ ते ८ टन, खाडीची ३०० किलो, तर नदीतील मासळीची सुमारे २ टन आवक झाली होती. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १० ते १२ टन आवक असल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळीचे दर (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १६००-, मोठे १६००, मध्यम : १०००-१२००, लहान ८००, भिला : ७००, हलवा : ६५०-७००, सुरमई : ७००-८००, रावस : लहान ७००, मोठा : ९००, घोळ : ७००, करली : -४००, करंदी  (सोललेली) : ४४०, भिंग : ४००, पाला : लहान ७००, मोठा १०००-१२००, वाम : पिवळी : लहान ४८०, मोठे - ७००-८००,  काळी : ४००, ओले बोंबील : १४०-२००, कोळंबी : लहान ३२०, मोठी : ४८० जंबो प्रॉन्स : १४००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १२००, मोरी : लहान : २४०, मोठी- ४००, मांदेली : १४०, राणीमासा : २४०, खेकडे : २८०, चिंबोऱ्या : ५००-६००.
 

खाडीची मासळी 
सौंदाळे : २८०, खापी २८०, नगली : लहान : ३००, मोठी ५५०-६००, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : लहान २०० मोठे २४०, शेवटे : २८० बांगडा : लहान १४०, मोठा -२००, पेडवी : १००, बेळुंजी : १६०-, तिसऱ्या : २४०, खुबे १४०, तारली : १४०.

नदीची मासळी 
रहू : १४०-१६०, कतला : १८०, मरळ : लहान २८० मोठे- ४००,, शिवडा : २४०, चिलापी : ८०, खवली : २८०, आम्ळी : १०० खेकडे : २८०, वाम : ५५०.

मटण
बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.

चिकन 
चिकन : १७०, लेगपीस : २००, जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०. 

अंडी 
गावरान : शेकडा : ६६०, डझन : ९० प्रतिनग : ७.५ इंग्लिश : शेकडा : ३६२ डझन : ५४ प्रतिनग : ४.५.


इतर ताज्या घडामोडी
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...