पुण्यात कांदा, शेवग्यासह पालेभाज्यांचे दर वाढले

पुणे बाजारसमितीत झालेली शेतीमालाची आवक
पुणे बाजारसमितीत झालेली शेतीमालाची आवक

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. ३) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत विविध भाजीपाल्याची आवक वाढली. कांद्याची मागणी वाढल्याने आणि शेवग्याची आवक मंदावल्याने दर वाढले होते. पालेभाज्यांची आवक घटल्याने दर वाढले होते. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची अवघी सुमारे ३० हजार, तर मेथीची सुमारे अवघी २० हजार जुड्या आवक झाली होती.  

विविध भाजीपाल्याच्या आवकेत परराज्यांतील आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरचीची, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे १ टेम्पो, कर्नाटकातून श्रावण घेवड्याची २ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे अडीच हजार गोणी तर आग्रा आणि इंदूर येथून बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे १४०० गोणी, टॉमेटोची सुमारे ५ हजार क्रेट, कोबीची सुमारे १२ टेम्पो, फ्लॉवरची १५, सिमला मिरचीची १० तर भेंडीची सुमारे ८ टेम्पो, गवारीची सुमारे ५ टेम्पो, काकडीची १० टेम्पो, हिरवी मिरचीची ५ टेम्पो, तांबडा भोपळयाची सुमारे ८ टेम्पो, भुईमुगाची सुमारे ५० गोणी, तसेच कांदयाची सुमारे १३० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) : कांदा : नवीन ३५०-४००, जुना ५००-५५०, बटाटा : १४०-१८०, लसूण : १००-१४००, आले : सातारी ५००-७००, भेंडी : २००-२५०, गवार : ४००-५००, टोमॅटो : १५०-२००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : १००-१६०, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २५०-३००, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी - पांढरी - १८०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ६०-८०, वांगी : ३५०-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : १००-१६०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२५०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-३५०, वालवर : २५०-३००, बीट : १००-१४०, घेवडा : २००-२५०, कोहळा : १२०-१६०, आर्वी : ३५०- ४००, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २५०-३००, पावटा : ५००-६००, भुईमूग शेंग : ५००- ५५०, मटार : ६००-८००, तांबडा भोपळा : १२०-१६०, सुरण : २००-२५०, मका कणीस : ८०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या  पालेभाज्यांचे दर (शेकडा, जुडी) : कोथिंबीर : १५०० -३५००, मेथी : १०००-२२००, शेपू : ८००-१२००, कांदापात : १५०० -२२००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ८०० -१०००, पुदिना : ४०० -५००, अंबाडी : १०००-१२००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ७०० -८००, चुका : १०००-१५००, चवळई : १२०० -१३००, पालक : १५०० -२२००. 

फळबाजार  रविवारी (ता. ३) येथील फळ विभागात मोसंबीची सुमारे ५० टन, संत्रीची ८ टन, डाळिंबाची २५० टन, कलिंगडाची २० टेम्पो, खरबुजाची १० टेम्पो, पपईची २५ टेम्पो, लिंबांची सुमारे चार हजार गोणी, चिकूची एक हजार डाग, सीताफळाची २० टन तर विविध बोरांची सुमारे ७० गोणी आवक झाली होती.   

फळांचे दर : लिंबे (प्रतिगोणी) : १५०-२५०, मोसंबी : (३ डझन) : २१०-२५०, (४ डझन) : १३०-२४०, संत्रा : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन) : ५०-१३०, डाळींब (प्रतिकिलो) : भगवा : ०३-१२०, गणेश : १०-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-३०, चिकू : १००-६००, सीताफळ : ५-१२०, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) १८००-२५००, किन्नोर : (२५-३० किलो) २०००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ७००-१४००. बोरे - (दहाकिलोचे दर) चमेली - २५०-२८०, उमराण - १७०-१८०, चेकनट ६००-७५०, चण्यामण्या ६५०-७५०.    फूलबाजार फुलांची आवक वाढली असून, मागणी घटल्याने फुलांना उठाव कमी होता.  फुलांचे दर (प्रतिकिलो) : झेंडू : ५-२५, गुलछडी : ८-४०, बिजली : ५-२०, कापरी : ५-८, शेवंती : १०-५०, अ‍ॅस्टर : ५-१०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ८-२०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ५०-१३०, लिली बंडल : ८-१५, जरबेरा : २०-३०, कार्नेशियन : ८०-१२०. 

मासळी बाजार  गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. ३) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची ५०० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे २ टन आवक झाली होती. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे २० टन आवक झाली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात किनारपट्टीला क्यार चक्रीवादळाने झोडपल्याने मासळीची आवक कमी झाली होती. दिवाळीनंतर मासळीची मागणी वाढली असून, आवक कमी आणि मागणी जास्त झाल्याने खोल समुद्रतील मासळीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती.      खोल समुद्रातील मासळीचे दर (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १८००, मोठे १६००, मध्यम : ९००-१०००, लहान ७००-८००, भिला :५५०, हलवा : ५५०-५००, सुरमई : ७००-८००, रावस : ६००, घोळ : ६००, भिंग : ४००, करली : २८०-३२०, करंदी : ४००, पाला :  लहान  ७००-७५०,  मोठे - १०००-११००, वाम : लहान  पिवळी ५५०, मोठे  ८००-९००, काळी : ३६०, ओले बोंबिल : १६०-२४०. कोळंबी ः लहान  २०० मोठे  ५५०, जंबोप्रॉन्स : १६००, किंगप्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १४००-१५००, मोरी :  लहान  २४०-२८०, मोठे  ३६०-४००, मांदेली : १००-१४०, राणीमासा : १८०- २००, खेकडे : २००, चिंबोऱ्या‍: ४८०-५५०.  

खाडीची मासळी   सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : लहान  २८० मोठी ७००, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : १४० , मोठे  २४०, शेवटे : ४००, बांगडा : लहान  १६० ,मोठे  २६०-२८०, पेडवी : ८०, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १४०. 

नदीची मासळी   रहू : १४०-१६०, कतला : १४०-१६०, मरळ :३२०, शिवडा : २८०, चिलापी : ८०-१००, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २४० वाम : ५२०.  

मटण   बोकडाचे : ५२०, बोल्हाईचे : ५२०, खिमा : ५२०, कलेजी : ५८०.

चिकन   चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०.   

अंडी  गावरान : शेकडा : ७४० डझन : ९६ प्रति नग : ८. इंग्लिश : शेकडा : ४५० डझन : ६० प्रतिनग : ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com