agriculture news in marathi, commodity rates in market committee, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

पुण्यात कांदा, शेवग्यासह पालेभाज्यांचे दर वाढले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. ३) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत विविध भाजीपाल्याची आवक वाढली. कांद्याची मागणी वाढल्याने आणि शेवग्याची आवक मंदावल्याने दर वाढले होते. पालेभाज्यांची आवक घटल्याने दर वाढले होते. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची अवघी सुमारे ३० हजार, तर मेथीची सुमारे अवघी २० हजार जुड्या आवक झाली होती. 

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. ३) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत विविध भाजीपाल्याची आवक वाढली. कांद्याची मागणी वाढल्याने आणि शेवग्याची आवक मंदावल्याने दर वाढले होते. पालेभाज्यांची आवक घटल्याने दर वाढले होते. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची अवघी सुमारे ३० हजार, तर मेथीची सुमारे अवघी २० हजार जुड्या आवक झाली होती. 

विविध भाजीपाल्याच्या आवकेत परराज्यांतील आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरचीची, कर्नाटक आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबीची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे १ टेम्पो, कर्नाटकातून श्रावण घेवड्याची २ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे अडीच हजार गोणी तर आग्रा आणि इंदूर येथून बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली होती. 

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे १४०० गोणी, टॉमेटोची सुमारे ५ हजार क्रेट, कोबीची सुमारे १२ टेम्पो, फ्लॉवरची १५, सिमला मिरचीची १० तर भेंडीची सुमारे ८ टेम्पो, गवारीची सुमारे ५ टेम्पो, काकडीची १० टेम्पो, हिरवी मिरचीची ५ टेम्पो, तांबडा भोपळयाची सुमारे ८ टेम्पो, भुईमुगाची सुमारे ५० गोणी, तसेच कांदयाची सुमारे १३० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) : कांदा : नवीन ३५०-४००, जुना ५००-५५०, बटाटा : १४०-१८०, लसूण : १००-१४००, आले : सातारी ५००-७००, भेंडी : २००-२५०, गवार : ४००-५००, टोमॅटो : १५०-२००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : १००-१६०, दुधी भोपळा : २००-२५०, चवळी : २५०-३००, काकडी : १००-१२०, कारली : हिरवी - पांढरी - १८०-२००, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ६०-८०, वांगी : ३५०-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १२०-१४०, ढोबळी मिरची : १००-१६०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२५०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-३५०, वालवर : २५०-३००, बीट : १००-१४०, घेवडा : २००-२५०, कोहळा : १२०-१६०, आर्वी : ३५०- ४००, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २५०-३००, पावटा : ५००-६००, भुईमूग शेंग : ५००- ५५०, मटार : ६००-८००, तांबडा भोपळा : १२०-१६०, सुरण : २००-२५०, मका कणीस : ८०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. 

पालेभाज्या 
पालेभाज्यांचे दर (शेकडा, जुडी) : कोथिंबीर : १५०० -३५००, मेथी : १०००-२२००, शेपू : ८००-१२००, कांदापात : १५०० -२२००, चाकवत : ८०० -१०००, करडई : ८०० -१०००, पुदिना : ४०० -५००, अंबाडी : १०००-१२००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ७०० -८००, चुका : १०००-१५००, चवळई : १२०० -१३००, पालक : १५०० -२२००. 

फळबाजार 
रविवारी (ता. ३) येथील फळ विभागात मोसंबीची सुमारे ५० टन, संत्रीची ८ टन, डाळिंबाची २५० टन, कलिंगडाची २० टेम्पो, खरबुजाची १० टेम्पो, पपईची २५ टेम्पो, लिंबांची सुमारे चार हजार गोणी, चिकूची एक हजार डाग, सीताफळाची २० टन तर विविध बोरांची सुमारे ७० गोणी आवक झाली होती. 
 

फळांचे दर : लिंबे (प्रतिगोणी) : १५०-२५०, मोसंबी : (३ डझन) : २१०-२५०, (४ डझन) : १३०-२४०, संत्रा : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन) : ५०-१३०, डाळींब (प्रतिकिलो) : भगवा : ०३-१२०, गणेश : १०-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : ५-१०, खरबूज : १०-२०, पपई : ५-३०, चिकू : १००-६००, सीताफळ : ५-१२०, सफरचंद : सिमला (२५ ते ३० किलो) १८००-२५००, किन्नोर : (२५-३० किलो) २०००-३०००, काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ७००-१४००. बोरे - (दहाकिलोचे दर) चमेली - २५०-२८०, उमराण - १७०-१८०, चेकनट ६००-७५०, चण्यामण्या ६५०-७५०. 
 
फूलबाजार
फुलांची आवक वाढली असून, मागणी घटल्याने फुलांना उठाव कमी होता. 
फुलांचे दर (प्रतिकिलो) : झेंडू : ५-२५, गुलछडी : ८-४०, बिजली : ५-२०, कापरी : ५-८, शेवंती : १०-५०, अ‍ॅस्टर : ५-१०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ८-२०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ५०-१३०, लिली बंडल : ८-१५, जरबेरा : २०-३०, कार्नेशियन : ८०-१२०. 

मासळी बाजार 
गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. ३) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १० टन, खाडीची ५०० किलो तर नदीच्या मासळीची सुमारे २ टन आवक झाली होती. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे २० टन आवक झाली होती. दरम्यान गेल्या आठवड्यात किनारपट्टीला क्यार चक्रीवादळाने झोडपल्याने मासळीची आवक कमी झाली होती. दिवाळीनंतर मासळीची मागणी वाढली असून, आवक कमी आणि मागणी जास्त झाल्याने खोल समुद्रतील मासळीच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती.   
 
खोल समुद्रातील मासळीचे दर (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १८००, मोठे १६००, मध्यम : ९००-१०००, लहान ७००-८००, भिला :५५०, हलवा : ५५०-५००, सुरमई : ७००-८००, रावस : ६००, घोळ : ६००, भिंग : ४००, करली : २८०-३२०, करंदी : ४००, पाला :  लहान  ७००-७५०,  मोठे - १०००-११००, वाम : लहान  पिवळी ५५०, मोठे  ८००-९००, काळी : ३६०, ओले बोंबिल : १६०-२४०. कोळंबी ः लहान  २०० मोठे  ५५०, जंबोप्रॉन्स : १६००, किंगप्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १४००-१५००, मोरी :  लहान  २४०-२८०, मोठे  ३६०-४००, मांदेली : १००-१४०, राणीमासा : १८०- २००, खेकडे : २००, चिंबोऱ्या‍: ४८०-५५०.
 

खाडीची मासळी  
सौंदाळे : २४०, खापी : २००, नगली : लहान  २८० मोठी ७००, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : १४० , मोठे  २४०, शेवटे : ४००, बांगडा : लहान  १६० ,मोठे  २६०-२८०, पेडवी : ८०, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : १६०, खुबे : १४०, तारली : १४०. 

नदीची मासळी  
रहू : १४०-१६०, कतला : १४०-१६०, मरळ :३२०, शिवडा : २८०, चिलापी : ८०-१००, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २४० वाम : ५२०.
 

मटण  
बोकडाचे : ५२०, बोल्हाईचे : ५२०, खिमा : ५२०, कलेजी : ५८०.

चिकन  
चिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २५०. 
 

अंडी 
गावरान : शेकडा : ७४० डझन : ९६ प्रति नग : ८. इंग्लिश : शेकडा : ४५० डझन : ६० प्रतिनग : ५.


इतर बाजारभाव बातम्या
सांगलीत गूळ सरासरी ३४६० रुपये सांगली :  येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी...
कोल्हापुरात टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
औरंगाबाद : बाजरी, सोयाबीनचे दर स्थिर;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात पालेभाज्यांसह शेवगा, बीटच्या...पुणे ः अवकाळी पावसामध्ये खरिपातील...
औरंगाबादेत गाजर २००० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत मेथी जुडी प्रतिशेकडा ६०० ते १०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कांदा दोन ते दहा हजार रुपये...पुणे ः गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरातील...
जळगावात वांगी १८०० ते २९०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सोलापुरात कांद्याला कमाल ११ हजार दरसोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पुणे बाजार समितीत तैवान पिंक पेरूची आवकपुणे : राज्यात सध्या पेरूचा हंगाम सुरू झाला असून...
सोलापुरात गवार, भेंडी, काकडीला उठावसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरला सोयाबीनची आवक वाढलीनगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
कोल्हापुरात गतसप्ताहापासून कांदा दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
पुण्यात वांगी, घेवडा, शेवग्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाण्याला ४००० ते ६००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये...जळगावात २२०० ते ३२०० रुपये  जळगाव...
जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...