सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये क्विंटल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४) गुळाची १८६४ क्विंटल आवक झाली. गुळास ३२०० ते ३८७५ रुपये तर सरासरी ३४३० रुपये क्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील शिवाजी मंडईत शनिवारी वांग्याची ३० ते ४० बॉक्स (एक बॉक्स २० किलोचे) आवक झाली. त्यास ४०० ते ५०० रुपये प्रतिदहा किलो असा दर होता. कारल्याची १२५ पिशव्यांची (दहा किलोची एक पिशवी) आवक झाली. कारल्याला २५० ते ३०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. हिरवी मिरचीची ५० पोती (एक पोते ५० किलोचे) आवक झाली. मिरचीला ३५० ते ४५० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची ५० बॉक्स (एक बॉक्स २० किलोचे) आवक झाली. या मिरचीला ३०० ते ४०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. टोमॅटोची ३०० क्रेट आवक झाली.

टोमॅटोला १०० ते १२० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. कोथिंबिरीची १० हजार पेंड्या आवक झाली. कोथिंबिरीस प्रतिशेकडा ८०० ते १००० रुपये असा दर मिळाला. पालकाची १६०० ते २००० पेंड्या आवक झाली. पालकाला प्रतिशेकडा ५०० ते ६०० रुपये असा दर मिळाला. कांदा पातीची १२०० पेंड्या आवक झाली. कांदा पातीस प्रतिशेकडा ७०० ते ८०० रुपये असा दर होता. मेथीची ३००० पेंड्या आवक झाली. मेथीला प्रतिशेकडा ७०० ते ८०० रुपये असा दर मिळाला. चाकवतची ६०० पेंड्या आवक झाली. चाकवतास प्रतिशेकडा ७०० ते १००० रुपये असा दर होता. शेपूची १००० पेंड्या आवक झाली होती. शेपूस प्रतिशेकडा ६०० ते ७०० रुपये असा दर होता. लिंबाची ४० गोणीची आवक झाली. त्यास प्रतिशेकडा ३०० ते ४०० रुपये असा दर होता.  

सांगली बाजार समितीत शनिवारी (ता. १४) शेतीमालाची झालेली आवक व दर (क्विंटल)
शेतीमाल आवक किमान कमाल सरासरी दर
बेदाणा ४२०८ ७००० १८,१०० १४,०००
ज्वारी (हायब्रीड)  ६७  २५५० ३००० २७७५
बाजरी ३०  २४००  २६०० २५००
गहू  २४० २४०० ३००० २७००
तांदूळ  ६९७ ३४०० ६००० ४२००
मसूर  ५० ५१०० ५४०० ५२५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com