साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलो

गवार
गवार

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. २२) गवार, कारले, काकडी, शेवगा तेजीत आहेत. गवारीची सहा क्विंटल आवक झाली. गवारीस दहा किलोस २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला आहे. गवारीस गुरुवारच्या (ता. १७) तुलनेत दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजारसमितीत कारल्याची तीन क्विंटल आवक झाली असून दहा किलो कारल्यास २५० ते ३०० रुपये दर मिळाला आहे. काकडी १६ क्विंटल आवक झाली असून, दहा किलो काकडीस १५० ते २०० रुपये दर मिळाला आहे. शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली. शेवग्यास दहा किलोस २५० ते ३०० रुपये दर मिळाला आहे. कारले, काकडी, शेवग्यास दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे.

वांग्याची दहा क्विंटल आवक झाली असून, वांग्यास दहा किलोस १०० ते १३० रुपये दर मिळाला आहे. टोमॅटोची ४३ क्विंटल आवक झाली असून दहा किलो टोमॅटोस ४० ते ६० असा दर मिळाला आहे. फ्लॉवरची ४५ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला दहा किलोस १०० ते १५० रुपये दर मिळाला आहे. हिरवी मिरचीची १० क्विंटल आवक झाली असून, दहा किलो मिरचीस १५० ते २०० रुपये दर मिळाला आहे.

मागील सप्ताहापासून पावटा व वाटाण्याचे दर स्थिर आहेत. पावट्याची दोन क्विंटल आवक झाली असून, दहा किलो पावट्यास ४०० ते ५०० रुपये दर मिळाला आहे. वाटाण्याची तीन क्विंटल आवक होऊन दहा किलो वाटाण्यास ६०० ते ७०० रुपये दर मिळाला आहे. काळा घेवड्याची दोन क्विंटल आवक झाली. दहा किलो काळा घेवड्यास ४०० ते ५०० रुपये दर मिळाला आहे.

वाल घेवड्याची एक क्विंटल आवक होऊन दहा किलो वालला ३०० ते ३५० रुपये दर मिळाला आहे. पालेभाज्यात कोथिंबीर तेजीत आहे. कोथिंबिरीची २००० जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीस शेकड्यास ८०० ते १२०० रुपये दर मिळाला आहे. मेथीची १५०० जुड्यांची आवक झाली असून, मेथीस शेकड्यास १००० ते १५०० रुपये दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com