हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल

हळद
हळद
हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. २०) हळदीची ४००० क्विंटल आवक झाली. यावेळी हळदीला ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
 
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव हळद मार्केट यार्डावर आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार हे तीन दिवस हळद आवक घेतली जाते. सध्या यंदाच्या हंगामातील हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. अन्य शेतीमालामध्ये गुरुवारी (ता. १९) हरभऱ्याची ९१० क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला ३००० ते ३२५० रुपये क्विंटल असा दर मिळाला. सोयाबीनची ९०० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला ३५०५ ते ३७०५ रुपये क्विंटल असे दर मिळाले.
 
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १९) येथील बाजार समितीत हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. गुरुवारी हळद कांडीची २५४ क्विंटल आवक झाली. यास ५५०० ते ७००० रुपये क्विंटल असे दर मिळाले. हळद गोळ्याची ८७ क्विंटल आवक झाली. यास ५५०० ते ६५०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. गव्हाची १३ क्विंटल आवक झाली. गव्हाला १६२५ रुपये क्विंटल असे दर मिळाले. हरभऱ्याची ९८ क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला ३१६१ ते ३२०० रुपये क्विंटल असे दर मिळाले.
 
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. १९) कापसाची ५०० क्विंटल आवक झाली. कापसाला ३००० ते ३१०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. हरभऱ्याची ७० क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला ३२०० ते ३२५० रुपये क्विंटल असे दर मिळाले. सोयाबीनची २० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला ३४०० ते ३५५० रुपये क्विंटल असे दर मिळाले.
 
तुरीची ३० क्विंटल आवक झाली. तुरीला ३५०० ते ३६५० रुपये क्विंटल असे दर मिळाले. गव्हाची १५० क्विंटल आवक झाली. गव्हाला १६०० ते १७०० रुपये क्विंटल असे दर मिळाले. ज्वारीची २० क्विंटल आवक झाली. ज्वारीला १६५० ते १७०० रुपये क्विंटल असे दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com