agriculture news in marathi, commodity rates in market committee,satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यात शेवगा १५० ते २०० रुपये दहा किलो
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 मे 2018
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ९) शेवगा, वाल घेवडा यांचे दर तेजीत होते. गवार, मेथीच्या आवकेत वाढ झाली. शेवग्याची तीन क्विंटल आवक झाली. शेवग्यास १५० ते २०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. शेवग्याच्या दरात रविवारच्या (ता. ६) तुलनेत दहा किलोमागे ५० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्याल सूत्रांनी दिली आहे. 
 
सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ९) शेवगा, वाल घेवडा यांचे दर तेजीत होते. गवार, मेथीच्या आवकेत वाढ झाली. शेवग्याची तीन क्विंटल आवक झाली. शेवग्यास १५० ते २०० रुपये प्रतिदहा किलो असा दर मिळाला. शेवग्याच्या दरात रविवारच्या (ता. ६) तुलनेत दहा किलोमागे ५० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्याल सूत्रांनी दिली आहे. 
 
बाजार समितीत वाल घेवड्याची एक क्विंटल आवक झाली. वाल घेवड्यास २५० ते ३५० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. वाल घेवड्याच्या दरात दहा किलोमागे ५० रुपयांनी वाढ झाली आहे. वाटाण्याची तीन क्विंटल आवक झाली. वाटाण्यास ७०० ते ८०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला.
 
हिरव्या मिरचीची २१ क्विंटल आवक झाली. मिरचीस १०० ते १५० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. ढोबळी मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला २०० ते २५० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. काकडीची दहा क्विंटल आवक झाली. काकडीस १५० ते २०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला.
 
काळा घेवड्याची तीन क्विंटल आवक झाली. काळा घेवड्यास ३०० ते ३५० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला आहे. ओल्या भुईमूग शेंगांची दोन क्विंटल आवक झाली. या शेगांना ३०० ते ३५० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला आहे. फ्लॉवरची १३ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला ८० ते १०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. भेंडीची आठ क्विंटल आवक झाली. भेंडीस १५० ते २५० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. 
 
बाजार समितीत गवारी, मेथीच्या आवकेत वाढ झाली आहे. गवारीची १३ क्विंटल आवक झाली. गवारीस १५० ते २०० रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला आहे. पालेभाज्यांत मेथीची १००० जुड्या आवक झाली. मेथीस शेकडा १००० ते १२०० रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीची १५०० जुड्या आवक झाली असून, कोथिंबिरीस शेकडा ८०० ते १००० रुपये असा दर मिळाला. 

इतर ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...